मनोरंजन

‘पिंग पॉंग’ ओटीटीच्या ‘हिडन’ वेबसिरीजचे पोस्टर लॉंच!

‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’च्या ‘पिंग पॉंग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच येऊ घातलेल्या ‘हिडन’ या नव्या भव्य वेबसिरीजच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. येत्या १६ जुलै रोजी ही वेबसिरीज ‘पिंग पॉंग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आज कलाकारांच्या उपस्थितीत सोशल मीडियावर ‘हिडन’चे पोस्टर रिलीज करण्यात आले. गहाण रहस्याची उकल करणारे चेहरे या पोस्टरवर असून सोशल मीडियावर हे पोस्टर रिलीज होताच नेटकऱ्यांमध्ये कमालीचे कुतूहल तयार झाले असून त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

लोकप्रिय अभिनेते संतोष जुवेकरांची ‘हिडन’ या वेबसिरीज मध्ये प्रमुख भूमिका आहे. त्याविषयी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले “माझी ‘हिडन’मध्ये अत्यंत वेगळी भूमिका आहे. यात मी एसीपी प्रदीप राजे ही भूमिका साकारत आहे. हा अनुभव माझ्यासाठी रोमांचक आहे. प्रचंड मेहनत घेऊन आमच्या टीमने ही वेब सिरीज तयार केली आहे. आज ‘हिडन’चं नुसतं पोस्टर प्रदर्शित झालंय, आणि ते पाहून प्रेक्षकांनी कमाल प्रतिक्रिया दिल्यात, आमच्या मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान मिळत आहे. ‘हिडन’ मध्ये दडलंय काय? याचं रहस्य १६ जुलैला ‘पिंग पॉंग’ ओटीटीवर उलगडणार आहे. मला पक्की खात्री आहे, ‘हिडन’ सर्वांना या ओटीटी प्लॅटफॉर्मवर खिळवून ठेवेल”.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध उदयोजक जीवन बबनराव जाधव यांनी ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ द्वारे ‘पिंग पॉंग’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म खास जगभरातील भारतीय प्रेक्षकांसाठी लॉंच केला आहे. या ओटीटीवर अत्यंत वेगळ्या आणि आकर्षक नव्या वेबसिरीज, वेब मुव्हीज, बॉलिवूड, हॉलिवूड मुव्हीज तसेच इतर एंटरटेन्मेन्ट शोज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. ‘हिडन’ वेबसिरीज बाबत बोलताना या वाहिनीचे सर्वेसवा सीएमडी जीवन बबनराव जाधव म्हणाले, “‘हिडन’ ही भव्य वेबसिरीज आहे. अनेक नामांकित कलावंतांच्या या वेब सिरीजमध्ये महत्वाच्या भूमिका आहेत. ‘सस्पेन्स, थ्रीलर, ऍक्शन प्रकारातील ही थरारक वेबसिरीज प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल.”

‘हिडन’ मध्ये नेमकं काय ‘हिडन’ आहे याविषयी लेखक दिग्दर्शक विशाल सावंत म्हणाले, “या नावावरूनच कळते कि यात काहीतरी हिडन आहे. पण नेमकं काय हिडन आहे ते कळण्यासाठी प्रेक्षकांनी या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहणं गरजेचं आहे. ही एक डार्कशेड असलेली मुंबई शहरातील गोष्ठ आहे. हिडन मधील सर्व व्यक्तिरेखा काल्पनिक असून गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी आहे. गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील वेगवान घटना प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील. डार्कलूक असलेलं ‘हिडन’चं पोस्टर कुतुहलासोबतच तीव्र उत्सुकता तयार करीत आहे.”

‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.”साठी विशाल पी. सलेचा आणि महेश पटेल यांनी ‘हिडन’ची निर्मिती केली असून विशाल सावंत यांनी या वेबसिरीजचे लेखन दिग्दर्शन केले आहे. कमल सिंग यांचे छायांकन असून रसीद खान यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. ‘हिडन’ मध्ये संतोष जुवेकर, संजय सोनू, दक्ष अजित सिंग, जीत सिंग, मानवीर चौधरी, रजत वर्मा, रोहित परशुराम आणि संदीप पाठक यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

ओरिजनल मनोरंजनाचा अमर्याद आनंद मिळविण्यासाठी आपल्याला ‘गुगलप्ले स्टोअर’ किंवा ‘ॲपस्टोअरवर’ जाऊन ‘पिंग पोंग’ हे ॲप डाऊनलोड करावे लागेल किंवा https://pingpongentertainment.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करणे खूपच सोपे आहे.

पोस्टर रिलीज youtube व्हिडीओ लिंक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button