जयश्री फाउंडेशन तर्फे (# BARKFORLIFE) या प्रकल्पांतर्गत रिफ्लेक्टिव्ह कॉलर बेल्ट ड्राइव्हचे आयोजन संपन्न

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई : रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी जयश्री फाउंडेशन तर्फे # barkforlife या प्रकल्पांतर्गत रिफ्लेक्टिव्ह कॉलर बेल्ट ड्राइव्हचे आयोजन केले गेले. विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी (VSIT) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ह्या कार्यक्रमामध्ये 80 हून अधिक भटक्या कुत्र्यांना चमकणारे पट्टे (रिफ्लेक्टिव्ह कॉलर बेल्ट) बांधण्यात आले. ज्याने हि भटकी कुत्री रस्त्यावर वावरताना त्यांचा अपघात न होण्यासाठी ह्या रिफ्लेक्टिव्ह कॉलर बेल्टमुळे मदत होऊ शकेल. नेरूळ, सीवूड्स, सानपाडा, जुईनगर येथील भटक्या कुत्र्यांना रिफ्लेक्टिव्ह कॉलर बेल्ट घालण्यात आले.

नवी मुंबई वार्ताशी बोलताना जयश्री फाउंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष वैभव प्रशांत जाधव ह्यांनी सांगितले कि, “या कार्यक्रमात २५ हून अधिक स्वयंसेवक स्वतःहून सहभागी झाले होते. हि आमच्या फाउंडेशनसाठी मोठी उपलब्धी आहे. त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. हा कार्यक्रम जयश्री फाउंडेशन तसेच विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी (VSIT) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ह्यांच्या युनिटच्या सहकार्याने आयोजित केला होता. यावेळी आम्ही ८०+ भटक्या कुत्र्यांना रिफ्लेक्टिव्ह कॉलर बेल्ट घातले. यावेळी काही कुत्रे घाबरून प्रतिसाद देत नसल्याने आम्ही त्यांना सोडून दिले यापुढे देखील अशा प्रकारचे आयोजन करून त्यांना रिफ्लेक्टिव्ह कॉलर बेल्ट घालू. जेणेकरून रात्रीच्या वेळी त्यांचे अपघातापासून त्याचे संरक्षण होईल.”