पांडवकडा बनलाय मृत्यूदूत:
काल दि. 22/06/2021 रोजी खारघर पोलीस ठाणे हद्दीत पांडवकडा येथे मानखुर्द गोवंडी येथील शालेय मित्र गौरव लोखंडे, अखीप खान, सुरज यादव, मौसम घरती, राहील खान असे संध्याकाळी 03.30 वाजण्याच्या सुमारास आले. त्यात गौरव लोखंडे व राहिल खान तसेच मौसम घरती यांनी डोहामध्ये उड्या मारल्या त्यात गौरव व राहील डोहातून वर आले परंतु मौसम घरती हा डोहातून वर आला नाही. लागलीच त्यांनी नवी मुंबई कंट्रोलला कळविले. फायर ब्रिगेड व खारघर पोलिस यांनी पाण्यात गळ टाकून तसेच प्रत्यक्ष शस्वीमर पाठवून त्याचा शोध घेतला परंतु रात्री पर्यंत बॉडी मिळून आली नाही. आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी सदर डोहातील खडकाखाली मौसमचे अडकलेले प्रेत बाहेर काढले
मयताचे नाव – मौसम रामबहादुर घर्ती, वय 18 वर्षे, राहणार – मानको मेडिकल जवळ, गोवंडी पश्चिम, मुंबई त्याचे नातेवाईक व इतरांना माहिती दिली असून प्रेत पोस्टमार्टम कामी पाठवण्यात आलेले आहे.
खारघर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ह्यांनी पावसाळा सुरू होताच आपले चॅनेल, पेपरच्या माध्यमातून पाडंवकडा येथे जाऊन नये तेथे मृत्यु होवु शकतो म्हणून आवाहन केले होते तरी लोक कुठुनही डोंगरातून पायवाटेने डोगंरातील धबधब्यात जातात व जीवनास मुकतात. तरी पुन्हा वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी खारघर डोंगरात जाऊ नये म्हणून जनतेस आवाहन केले आहे.
सदर ठिकाणावर दर शनिवार, रविवार, इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटक या धबधब्याच्या धारेखाली बसण्यासाठी येथे जमा होतात, पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी जातात तेव्हा पाण्याच्या धबधब्या सोबत डोंगरावरील दगड घरंगळत येऊन धबधब्याखाली बसलेल्या पर्यटकांच्या डोक्यात पडून त्यांना गंभीर दुखापती होतात तसेच सदर परिसरात जमा झालेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटक पाण्यात बुडून मृत्यू झालेले आहे. मागील वर्षी 4 तरूणी पाण्यात बुडून मृत्यु पावल्या होत्या, अशा घटना होऊ नये याकरता मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी सो. पनवेल विभाग, नवी मुंबई, यांचेकडून फौजदारी प्रक्रिया सहिताचे कलम 144 प्रमाणे दिनांक 07 जून 2021 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत,
तरी याद्वारे सर्व खारघर रहिवाशी व पर्यटक यांना सुचित करण्यात येते की सदर प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटन करताना कोणी व्यक्ती मिळून आल्यास त्यांच्यावर खारघर पोलीस ठाणेकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी सांगितले आहे.
१२ जून रोजी नवी मुंबई वार्तामध्ये “खारघर पोलीस ठाणे कडून सर्व नागरिक व पर्यटक यांना जाहीर आव्हान” ह्या माथळाखाली बातमी छापली होती. तरी नागरिक ऐकत नसतील तर प्रशासनाने अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी.