पुन्हा एकदा सांस्कृतिक आर्थिक महाराष्ट्र…
मैत्रेय दादाश्रीजींचा संदेश
चला तर मग, पुन्हा एकदा नवी भरारी घेण्यासाठी सज्ज होऊ या! भरारी भारताला सक्षम करण्याची, भरारी भारताला समृद्ध करण्याची! या संपन्नतेच्या वाटचालीचा आधार ही भारताची खरी ओळख असलेली भारताची विशाल संस्कृती आहे. याच संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी ‘मैत्री कल्चरल इकोनॉमी समिट’ ची सुरुवात झाली. सांस्कृतिक भारताचे, आर्थिक भारतासह समीकरण कसे जोडता येईल यासाठी अथक प्रयत्न आपण या संमेलना द्वारे करत आहोत.
दिल्लीत आपण या संमेलनाचे पहिले सत्र जुलै महिन्यात आयोजित केले. देशातील बौद्धिक आणि आर्थिक स्तरावर कार्यरत अनेक अग्रणी वरिष्ठांनी यात भाग घेतला. आपल्या या संकल्पनेला नवीन आकार, नवे रूप दिले. कोण- कोणत्या विविध मार्गांनी भारतीय संस्कृती द्वारे आपली आर्थिक प्रगती करता येईल या बद्दल आपले विचार त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. त्यातील प्रत्येकाने याचे केवळ समर्थनच केले नाही तर सर्वांचे भरभरून मार्गदर्शन देखील केले.
अशा या संमेलनाचा पुढील अध्याय जर पुरोगामी महाराष्ट्रात नाही करणार तर अन्य कुठे करणार? संतांच्या विचारांची परंपरा लाभलेला आणि त्याच बरोबर आजचा आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारा महाराष्ट्र – या सारखी दुर्मिळ सांगड आपल्याला संपूर्ण भारतात कुठेही पाहण्यास मिळत नाही. म्हणूनच आपल्या या संमेलनाचे एक विस्तृत रूप आपण 8 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित करत आहोत.
आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या आपल्या राज्याने नेहमीच अग्रणी भूमिका घेतली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त असताना देखील, महाराष्ट्राने प्रत्येकाला आपलेसे करून भरभरून प्रेम दिले. जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने देशाला मार्गदर्शनाचे कार्य केले आहे. कधीही न विसरता येणारे, कोविड च्या काळात केले गेलेले आपल्या महाराष्ट्राचे योगदान हे ‘व्हॅक्सिन’ च्या स्वरूपात संपूर्ण देशभर घरोघरी पोहोचले आहे. भारताने जगाला एकात्मतेचा संदेश दिला तर त्या एकात्मतेच्या संदेशाचा आत्मा हा आपल्याला संतांच्या शिकवणींच्या रुपात महाराष्ट्रास लाभला. म्हणून समजून घ्या की महाराष्ट्राचा विकास हा फक्त महाराष्ट्राचा विकास नसून संपूर्ण भारताचा विकास आहे.
आपल्या राजाच्या आर्थिक प्रगती करिता, महाराष्ट्रातील दडलेल्या आणि दबलेल्या संस्कृतीला पुन्हा जागृत करून आपल्या दैनंदिन जीवनात कसे समाविष्ट करता येईल या करिता प्रत्येकाला आपले योगदान द्यावे लागेल. महाराष्ट्राला पुन्हा एकदा समृद्धीच्या शिखरावर घेऊन जाण्याचा हा एक प्रयत्न आहे.
आज महाराष्ट्रात आयोजित केले जाणारे ‘मैत्री कल्चरल इकोनॉमी समिट’ हे बीज स्वरूपात आहे. कालांतराने ह्या बीजाचे खोडात, फांद्यांत रूपांतर होईल आणि जेव्हा फळे, फुले निर्माण तेव्हा आपल्याला खरोखरीच महाराष्ट्राची संस्कृती आणि मूल्ये सांभाळणारा एक समृद्ध वैभवशाली महाराष्ट्र पाहण्यास मिळेल.