पाचल मुस्लिमवाडी येथे कोरोना टेस्टला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद:
राजापूर प्रतिनिधी (तुषार पाचलकर): दिनांक २३ जुलै रोजी माननीय तहसिलदार प्रतिभा वराळे मॅडम आणि मा. गटविकास अधिकारी सागर पाटील साहेब यांनी पाचल ग्रामपंचायतीला भेट देऊन जास्तीत जास्त कोव्हीडच्या टेस्टिंग करून घेणेबाबत आव्हान केले होते, त्यावेळी संपूर्ण तालुक्यात सर्वात जास्त टेस्ट केलेली “पाचल ग्रामपंचायत” असे गौरव उदगार देखील गटविकास अधिकारी श्री. सागर पाटील यांनी काढले होते.
प्रत्येक गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी या सूचनेनुसार तसेच तहसीलदार वराळे मॅडम यांच्या आव्हानानुसार आज दि. २४ जुलै रोजी आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका – आशा सेविका, यांच्या सहकार्याने पाचल मुस्लिमवाडी येथे ग्रामपंचायतीने कोरोना टेस्ट चे नियोजन केले होते त्यासाठी तीन टीम तयार करण्यात आल्या होत्या .
आज सकाळी 10 वाजल्यापासून पाचल मुस्लिमवाडी येथे कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यावेळी मुस्लिमवाडी येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले यामुळे आज 300 च्या आसपास नागरिकांच्या टेस्ट करण्यास आरोग्य विभाग व पाचल ग्रामपंचायतला यश आले.
यावेळी वाडीतील सामाजिक कार्यकर्ते अफझल पाटणकर, काशिम गडकरी, पाचल परिसरातील आरोग्य सहाय्यक टी.बी. पाटील, आरोग्य सेवक सचिन झोरे, व्ही. के. ढोले, ए. के. घाडगे, वैभव नलावडे, तसेच अंगणवाडी सेविका दिलशाद फरास, अशा मोहिरे, प्रियांका सुतार, प्रीती जाधव, अंगणवाडी मदतनीस शशिकला जाधव यांचे या कार्यास विशेष सहकार्य लाभले.
या प्रसंगी पाचल ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. अपेक्षा मासये, उपरपंच किशोरभाई नारकर, सदस्य सिद्धार्थ जाधव सर, सदस्य रजिया गडकरी, सदस्य विनायक सक्रे, तसेच ग्रामविकास अधिकारी श्री. अर्जुन नागरगोजे भाऊ, व मुख्य लिपिक सुहास बेर्डे उपस्थित होते.