महाराष्ट्र

पाचल-कोडं-झर्ये रस्त्याची दुर्दशा:

राजापूर प्रतिनिधी (तुषार पाचलकर) : राजापूर तालुक्यातील पाचल-कोडं-झर्ये रस्ता (इ.जि.मा. १०६) वर दिवाळवाडी स्मशानभूमी जवळ मोरीचा एका बाजूचा कठडा कोसळून मोरीच्या पाईपला दगड अडकून बसल्याने मोरी बंद झाली होती. त्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत होते. सदरचा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून सदरचा रस्ता तसेच रस्त्यावरील मोऱ्या पूर्णपणे नादुरुस्त झालेल्या आहेत. सदर रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीमार्फत सतत पाठ पुरावा करण्यात येत होता.

ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने मोरीचा अडथळा दूर करून रस्ता रहदारीस सुरळीत करून दिला. ग्रामपंचायतने तातडीने घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि केलेल्या कामगिरीबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी पाचल ग्रामपंचायत सरपंच सौ. अपेक्षा मासये, उपसरपंच श्री. किशोर नारकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक सक्रे, ग्रामविकास अधिकारी श्री. अर्जुन नागरगोजे भाऊ, मुख्य लिपिक सुहास बेर्डे, पाणीपुरवठा कर्मचारी बाबा गोसावी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button