प्रतिनिधी, नवी मुंबई:
नेरुळ पामबीच मार्गांवर डोक्यात विजेचा खांब डोक्यात पडून मरण पावलेल्या ऐरोलीतील तरुणाच्या नातेवाईकास नोकरीत सामावून घ्यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी दि.२१ रोजी न.मु.म. पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली.
या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, नुकतीच एक दुर्घटना घडली असून ऐरोली शिवकॉलीनीत राहणारा विशाल नारळकर हा युवक कामावरून येताना पामबीच मार्गांवर अतिवृष्टीने पदपथावरील विजेचा खांब डोक्यात पडून मरण पावला तसेच गेल्यावर्षी ऐरोली गावातील बळीराम पाटील यांचा देखील सेक्टर १७ येथील अभुदय बँकेजवळ डोक्यात झाड पडून मृत्यू झाला होता. या दोन्ही मयताच्या नातेवाईकांना पालिकेने आर्थिक मदत करावी व कुटूंबातील एका व्यक्तीस पालिकेत नोकरीस घ्यावे. याला आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी असे सांगितले की, पालिकेकडून व शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येईल व कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर नोकरीवर घेतले जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी गणेश म्हात्रे, चंद्रशेखर मढवी, शाखाध्यक्ष राकेश पवार, व पत्रकार विजय गायकवाड उपस्थित होते.