ओएनजीसी प्रकल्पात मोराचा वावर
उरण (दिनेश पवार)
उरण तालुक्यातील उरण शहरात असलेल्या ओएनजीसी प्रकल्पात मंगळवार (दि .८) रोजी मोर दिसून आल्याने कामगार वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोर या पक्षाच ओएनजीसी प्रकल्पात प्रथमच दर्शन झाल्याने सदर मोरांचे जतन करण्यासाठी ओएनजीसी आणि वन विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी कामगार वर्ग करीत आहेत.
पावसाची चाहूल लागताच उरण तालुक्यातील चिरनेर, चिर्ले, वेश्वी, कळंबुसरे, पुनाडे, जेएनपीटी, आवरे, केगाव या परिसरात मुक्त संचार करणाऱ्या मोरांचा वावर दिसून येत आहे. परंतु डोंगर परिसरातील वाढत्या उत्खननामुळे आणि शिकारीमुळे या परिसरातील मोरांची संख्या हळूहळू कमी होत आहे. त्यात नूकताच ओएनजीसी प्रकल्पातील कामगारांना ओएनजीसी प्रकल्पातील झाडा झुडपांतील संरक्षण जाळीवर मोर या राष्ट्रीय पक्षाच प्रथमच दर्शन प्राप्त झाले. त्यामुळे प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
ओएनजीसी प्रकल्पात मोराच दर्शन प्रथमच झाल्याने सदर मोरांच संरक्षण करण्यासाठी ओएनजीसी आणि वन विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जात आहे.