पाचल – जवळेथर मार्गावरील तळवडे ब्रिज लवकरच वाहतूकिसाठी सज्ज होणार……
पाचल, दिनांक 25 जुलै (तुषार पाचलकर): रत्नागिरी जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून अतिवृष्टी होत आहे.अनेक ठिकाणी नद्यांना पूर येऊन अतोनात नुकसान झाले आहे. अर्जुना नदीवरील पाचल तळवडे ब्रिजचा बहुतांश भाग हा पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. पाचल-जवळेथर हा या प्रमुख जिल्हा मार्गावर असलेल्या या ब्रिज मुळे जामदा खोऱ्यातील पंचवीस तीस गावांसह तळवडे-ताम्हाणे या मोठ्या गावांचा पाचलशी असलेला संपर्क तुटला आहे. सर्व अधिकारी व लोक प्रतिनिधीनी येऊन पाहणी करून जात आहे. तहसीलदारांनी पाहणी करून ब्रिजवरील रहदारी बंद ठेवण्याचे आदेश दिले. परंतु लोक जीवाची पर्वा न करता ब्रिजवरून ये-जा करत असल्याचे निदर्शनास येते. काही मोठी दुर्घटना होण्या आधी ब्रिजची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.
हा ब्रिज नव्याने बांधण्याची गरज असून ब्रिज बांधताना उंची वाढविणे गरजेचे आहे. याबाबतची मागणी अनेक वर्षांपासून अनेक लोकप्रतिनिधी करत आहेत. परंतु त्या मागणी कडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. आता हा पूल तात्पुरता दुरुस्त करून रहदारीस चालू करण्यात येणार असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आज २६ जुलै रोजी बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी ब्रिज ची पाहणी करण्यासाठी येणार असून पुढील पंधरा दिवसात ब्रिज ची दुरुस्ती करून रहदारीस योग्य होईल असा अभिप्राय सार्वजनिक बांधकाम विभाग देत आहे. परंतु भविष्याचा विचार करून येते नवीन ब्रिज बांधला जावा अशी आग्रहाची मागणी या भागातील ग्रामस्थ तसेच पाचल ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
कित्येक वर्षे अतिवृष्टी झाली कि नदीला पूर येऊन ह्या ब्रिज वरून नदीचे पाणी वाहते परंतु आजपर्यंत कोणी मनापासून ह्या ब्रिजसाठी नवीन पर्यायचा विचार केला नसेल. भविष्यात अश्या प्रकारची घटना परत घडेल, परंतु येथील प्रशासन किव्हा राजकीय नेते आता तरी मनापासून ह्या ब्रिजसाठी नवीन पर्यायचा विचार करतील का?
घटना घडली का येऊन पाहणी करून जाणे एवढेच काम राहिले आहे का नेते मंडळींचं किंवा अधिकारी लोकांचं. आता तरी ह्यातून ह्या लोकांनी काही शिकावं.