मनोरंजन

स्टोरीटेलवर ऐका संजय सोनवणी लिखित ‘संभाजी महाराज आणि शहजादा अकबर’!

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

चिकित्सक मराठी माणूस’ या लेखमालिकेत लेखक संजय सोनवणी विविध ऐतिहासिक घटनांचा चिकित्सक आढावा घेणारे अभ्यासपूर्ण लेख लिहितात आणि विविध मान्यवरांच्या आवाजात दर आठवड्याला ते स्टोरीटेलवर सादर केले जातात. यापैकी ‘संभाजी महाराज आणि शहजादा अकबर’ हे प्रकरण आज प्रकाशित झाले आहे असून संदीप कर्णिक यांनी त्याला आवाज दिला आहे.

संभाजी महाराज आणि शाहजादा अकबर- स्वराज्यावर चारी बाजूंनी संकटे कोसळत असतांना शंभूराजांनी शाहजादा अकबराला आश्रय देऊन औरंगजेबाला डिवचले हा अविचार होता असे मानण्याचा प्रघात आहे. पण त्यामागे कोणती नीती होती? शिवरायांनी ठरवलेल्या दीर्घकालीन धोरणाचीच तर ती परिणती नव्हती ना? अवश्य ऐका, इतिहासावर एक आगळा प्रकाश टाकणारे विलक्षण प्रकरण!

ऐतिहासिक घटनांचा चिकित्सक आढावा घेत ‘संभाजी महाराज आणि शहजादा अकबर’ यांच्यावर अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे प्रख्यात लेखक संजय सोनवणी हे मराठी साहित्यविश्वातील आधुनिक काळातले महत्वाचे साहित्यिक, तत्वज्ञ, कवी आणि संशोधक आहेत. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलूंना विविध साहित्यप्रकाराद्वारे हात घालत विपुल साहित्य रचना केली आहे. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं लेखन नैतिक समस्यांबद्दलचे तसेच आधुनिक परिप्रेक्षात वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले चिंतनपर असून त्यांच्या बौद्धिक आणि तात्विक उंचीचा परिचय करून देते. त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला नवी परिमाणे मिळवून दिली आहेत. स्टोरीटेलवर साहित्यप्रेमींसाठी त्यांची असंख्य ऑडीओ बुक्स उपलब्ध आहेत.

आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ‘संभाजी महाराज आणि मुघल सम्राट शहजादा अकबर’ यांच्याबद्दलचं कमालीच कुतूहल जाणून घेण्यासाठी आपल्याला हे ऑडीओबुक ऐकवच लागेल. आणि ते ऐकण्यासाठी स्टोरीटेलची फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

विलक्षण कुतूहल निर्माण करणारं ‘संभाजी महाराज आणि शहजादा अकबर’ ऑडिओबुक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/books/sambhaji-dilerkhan-praakaran-ek-phaslela-kat-1539974

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button