बहुजन समाज पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(सुरेंद्र सरोज : ठाणे) बहुजन समाज पक्षातर्फे भास्कर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. समाजसेवक जितेंद्र झा यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व अनेक वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत असलेल्या झा यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो भीमसैनिकांनी दुपारी भास्कर नगर ते भोलाई नगर अशी उत्साहात रॅली काढली.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जयंती शांततेत साजरी करण्यात आली. यावर्षी लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. बहुजन समाज पार्टीच्या प्रभाग क्रमांक 36 च्या भावी उमेदवार गायत्री जितेंद्र झा यांनी रथावर उभ्या असलेल्या सर्व महिलांचे स्वागत व आभार मानले. महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, ह्यांनी भाषणात सांगितले की संविधान सर्वांसाठी समान आहे. काही लोक भाषणामधुन समाजात द्वेष निर्माण करत आहे. येत्या महापालिका निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आमचे गायत्री जितेंद्र झा बहुमताने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करून पुढे सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सोबत प्रशांत इंगले, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी संतोष भालेराव, ठाणे जिल्हा अध्यक्ष केदारनाथ भारती जी, ठाणे शहर प्रभारी सोबत सर्व भीम सैनिक उपस्थित होते.