ओमकार अपार्टमेन्ट, वाशी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न; लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद:
नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबई मनसे व इंफिगो आय केअर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ रोजी ओमकार अपार्टमेन्ट, सेक्टर १५, वाशी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १०० हुन अधिक नागरिकांनी ह्या शिबिराचा फायदा घेतला.
मनसेचे नवी मुंबई सचिव विलास घोणे व उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे ह्यांच्या शुभहस्ते ह्या शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष श्री. प्रताप भालेराव, सचिव श्री. वसंत जोशी, खजिनदार श्री. सुनील तावडे, उपाध्यक्ष श्री. संजय अडसूळे, श्री. लक्ष्मण कदम, माजी खजिनदार श्री. विश्वास मोरे व इतर सभासद उपस्थित होते.
मनसेचे वाशी उपविभाग अध्यक्ष संजय शिर्के ह्यांनी यावेळी सांगितले कि, “हे शिबिर ठेवण्यामागे फक्त सामाजिक बांधिलकी हा उद्देश होता. सोसायटी मधील नागरिकांनी ह्या शिबिराला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. ह्यापुढे सुद्धा असेच सामाजिक कार्यक्रम माझ्या हातून होत राहतील.”