एनएसजी कमांडो आणि स्माइल्स फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धीरज आहुजा व उमा आहुजा ह्यांनी घेतली विशेष मेहनत
भारतीय ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारतीय ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ स्माइल्स फाऊंडेशन (नवी मुंबई) आणि एनएसजी कमांडो (मुंबई) यांच्या वतीने बेलापूर आणि खारघर येथील आदिवासी ग्रामस्थांना झेंडे, चॉकलेट, मिठाई, सकस पौष्टिक अन्न आणि स्नॅक्स, माऊथवॉश आणि माऊथ फ्रेशनेसचे स्प्रे चे वाटप करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
NSG Commando and Smiles Foundation
भारतीय ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाईल. तसेच तिरंगा हा भारताच्या राष्ट्रीय अखंडतेचे आणि आकांक्षांचे प्रतीक आहे. प्रत्येक आदिवासी घरांमध्ये तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून एनएसजी कमांडो आणि स्माइल्स फाऊंडेशन च्या वतीने नवी मुंबईतील 800 हून अधिक आदिवासी कुटुंबांना तिरंग्याचे वाटप केले. फणसवाडी व सापेवाडी गाव, टायगर हिल्स बेलापूर, धामोळे गाव आणि गोल्फ कोर्स, खारघर या ठिकाणी हे वाटप करण्यात आले. भारतीय ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त, स्माइल्स फाउंडेशनने पोस्ट विभागामार्फत महिलांसाठी 500 विमा पॉलिसी आणि मुलींसाठी सुकन्या पॉलिसीचे यावेळी वितरण केले.
यावेळी कर्नल राजेश लांघे, धीरज आहुजा, उमा आहुजा आणि इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.