खवैय्यांसाठी नवे डेस्टिनेशन आयलीफ ग्रँड बँक्वेट फूड फेस्टिव्हल
नवी मुंबई, ३० ऑक्टोबर २०२१: आयलीफ ग्रँड बँक्वेट्सतर्फे गॅलेरिया मॉल, पाम बीच, वाशी येथे नवी मुंबईतील खवैय्यांसाठी पहिल्यावहिल्या फूड फेस्टिव्हलचे आयोजन शनिवारी, ३० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले होते. अनेक प्रसिद्ध सेलेब्रिट्रीजच्या उपस्थितीत होणारा हा फूड फेस्टिव्हल खवैय्यांसाठी नवे डेस्टिनेशन ठरणार आहे.
हा फूड फेस्टिव्हल तीन मोठ्या बँक्वेट हॉलसह कोर्टयार्डमध्ये आयोजित करण्यात आला होता. कोर्टयार्डमध्ये तीन ग्रीनरूमसह दोन अद्ययावत चेंजिंग रूम आहेत. त्यामुळे नागरिक तसेच सेलेब्रिटी आनंदाने त्यांच्या जेवणाचा आनंद लुटू शकतील. २२ हजार स्क्वेअर फूट जागेत विस्तारलेल्या आणि २१ फूट उंच असलेल्या अद्ययावत तसेच सुशोभित ग्रँड बँक्वेटमध्ये १०० ते १५०० पाहुणे उपस्थित राहू शकतात. या बँक्वेटमध्ये येऊन हजारो खवैय्यांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. त्यात शंभरहून अधिक स्टार्टर्स, मेन कोर्स, डेझर्ट्स तसेच ६० हून अधिक इंडियन आणि आंतरराष्ट्रीय क्युझिन्स अशा मेनूंचा समावेश आहे.
आयलीफ ग्रँड बँक्वेट फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन तसेच लोगोचे अनावरण ऐरोलीचे आमदार गणेशजी नाईक, आमदार संदीपजी नाईक, माजी खासदार संजीवजी नाईक, माजी नगरसेवक संपत शेवाळे साहेब, व्यवस्थापकीय संचालक प्रतीश आंबेकर तसेच संचालक अभिषेक कदम आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
आय लीफ बँक्वेट ही एक प्रमुख आणि प्रसिद्ध बँक्वेट सर्व्हिस आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही आय लीफ रिट्झ बँक्वेट्स, आर मॉल (ठाणे) आणि आता वाशीमध्ये आय लीफ बँक्वेट सुरू केले आहे. नवी मुंबईमध्ये केवळ एक बँक्वेट सुरू करण्यावर आम्ही समाधानी नाही. त्यामुळे भविष्यात नवी मुंबईतील नागरिक आणि खवैय्यांसाठी जास्तीत जास्त ग्रँड बँक्वेट्स पाहायला मिळतील. आम्हाला यापूर्वीच्या ग्रँड बँक्वेटमधून हजारो खवैय्यांनी चांगले खाद्य मिळाल्याची तसेच उत्तमोत्तम सेवा दिल्याची पोचपावती दिली आहे.
यापुढे आमच्या बँक्वेटमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे, असे आय लीफ ग्रँड बँक्वेट्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीश आंबेकर यांनी आय लीफ ग्रँड फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटनानंतर सांगितले.
आपल्या देशात फेस्टिव्हलची अनोखी परंपरा आहे. त्या निमित्ताने अनेक जण एकत्र येतात. आय लीफ ग्रँड बँक्वेट फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना एकत्रित बसून आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा, हाच आमचा उद्देश आहे. नवी मुंबईकरांच्या सेवेत अशी अद्ययावत आणि अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. ग्राहकांचे समाधान ही आमच्यासाठी सर्वात मोठी पोचपावती आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या हृदयात वसलेल्या आय लीफ ग्रँड बँक्वेट फूड फेस्टिव्हलचा आनंद सर्व खवैय्यांनी घ्यावा, असे आवाहन आय लीफ ग्रँड बँक्वेटचे संचालक अभिषेक कदम यांनी फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी केले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करून आय लीफ ग्रँड बँक्वेट फूड फेस्टिव्हल, नवी मुंबईचे आयोजन करण्यात आले होते.