NCCR पोर्टल वर citizen Financial cyber Fraud Reporting ही सुविधा कार्यान्वित झाल्याने त्याद्वारे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची रक्कम परत मिळविणे शक्य …
इंटरनेटच्या युगात बहुतांशी आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन केले जातात. सायबर गुन्हेगार हे विविध प्रकारच्या गुन्हेगारी कार्यपध्दतींचा अवलंब करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत.
भारत सरकार, गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांनी सायबर गुन्हे संदर्भातील सर्व तक्रारी महाराष्ट्रातील सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा स्तरावर संबधीत पोलीस ठाणेकडे स्वयंचलीतरीत्या वर्ग होण्याकरीता “National cyber crime Reporting Portal” कार्यन्वीत केले आहे. सदर पोर्टलचे मदतीने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीबाबतची माहिती भरून तक्रारदाराची ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम बँक / वॉलेट ई – कॉमर्स इ. कडून परत मिळणेसाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे व त्याबाबत सर्व पोलीस ठाणे येथे कामकाज करणारे अंमलदार अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. National Cyber Crime Reporting Portal हे सर्व पोलीस ठाणे येथे कार्यरत असून ऑनलाईन फसवणुक झाल्यास त्याबाबत ताबडतोब कार्यवाही करता येणे शक्य होणार असल्याने नागरीकांनी ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस भेट देवून ऑनलाईन फसवणूकी – बाबतची सर्व माहिती (Transaction details / Account Details / Suspect Mob. No.) सादर करणे गरजेचे आहे. त्यामुळे फसवणुक झाल्याबाबतची माहिती लवकरात लवकर पोलीस ठाणे मार्फतीने सायबर पोर्टलवरुन संबंधीत बँक / वॉलेट / ई – कॉर्मस ई . यांना कळवुन ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम डेबीट फ्रिज करण्याची आवश्यक ती कार्यवाही करता येणे शक्य होईल.
तरी सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणे येथे भेट देवुन वरिलप्रमाणे माहिती सादर करावी जेणेकरुन ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची रक्कम परत मिळविणे शक्य होईल. तसेच आर्थिक फसवणुक झाल्यासंबंधी माहिती सादर केल्यानंतर Acknowledgment Number प्राप्त होईल त्याचा उल्लेख करून https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंदविता येईल.
सायबर सेल, गुन्हे शाखा, नवी मुंबई