महाराष्ट्र

नवरात्रौत्सव निमित्त पूजेचे साहित्य खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरु

उरण (दिनेश पवार) गुरुवारपासून सुरु होणाऱ्या नवशक्तीच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी उरण शहरातील बाजारपेठही सजली आहे. नवरात्र काळात लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले असून पूजेच्या खरेदी करण्यासाठी महिलांची साहित्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. कोरोनामुळे वाढलेल्या महागाईचा फटका मातीच्या घटाबरोबरच देवीच्या नवरात्र उत्सवाला सुद्धा बसला आहे.

नवरात्रौत्सव गुरुवारपासून सुरु होत असल्याने बाजारपेठेत उत्सवासाठी लागणारे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यामध्ये घटस्थापनेसाठी आवश्यक असणारी मडकी, घट, मुकुट, फैटे, दागदागिने, मंदिर, तोरण, झालर, परडी, नाडा, आकर्षक झुंबर असे विविध साहित्य खरेदी करण्यास महिलांचे प्राधान्य आहे. पितृपंधरवडा झाल्यानंतर नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. दि. ७ ते दि. १५ या कालावधीत यावर्षी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात घरोघरी गणेश मूर्ती बसवितात. मात्र नवरात्रोत्सवात मात्र फक्त सार्वजनिक मंडळे दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करतात.

घटस्थापना करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू विक्री करण्यासाठी उरण बाजारात विक्रेत्यांनी गर्दी केली आहे. देवीच्या घटासाठी विधिवत पूजेसाठी लागणारे खण-साडी, बांगडी-ओटी तसेच घटाच्या पूजेसाठी पत्रावळीही बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. यामध्ये लहान मोठी अशा दोन प्रकारची पत्रावळी आहे. तसेच पाच फळे यामध्ये कोट, कवडा, सीताफळ, बेलफूल, पेरू याचा समावेश आहे.

देवीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमती देवीसाठी लागणारा घट (गरबा) नक्षीकाम केलेले ३०० रुपयास एक अशा भावाने विकतो असे लीलाबाई वाघरी यांनी सांगितले. तर लाल घट बाजारात ७० रुपयाला मिळत आहे, तर काळा घट ४० रुपयापर्यंत किमत आहे. त्यासाठी लागणारी परडी ५० रुपयाला मिळत आहे. पूजेसाठी लागणारे लाल कापड ६० रुपयाला आहे. तसेच हळद, कुंकू, कापूर, अगरबत्ती गुलाल, धूपकांडी ही बाजारात उपलब्ध आहे. मंदिरामध्ये देवीपुढे दिवा लावण्यासाठी वाती १५ रुपयाला आहेत. नारळ २० ते ३५ रुपयाला आहे. मोठी परडी १५० ते २०० रुपयाला आहे. तर मंडपी ४० रुपयाला आहे. देवीचे गार पाकीट ४० ते ८० रुपये, तसेव देवीच्या पूजेसाठी लागणारी लोभागदाणी, ऊददाणीही बाजारात आल्या आहेत. एक घट बसविण्यासाठी घटारवठी लागणारी काळी माती २० रुपयाला मिळत आहे. अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button