नवी मुंबई महानगरपालिका मा. आरोग्य सभापती तसेच मा. परिवहन सदस्य, मा. श्री. विक्रम धनाजी शिंदे (राजू भैया) साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते पदी नियुक्ती:
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
राजू भैया नावाने प्रसिद्ध असणारे माजी नगरसेवक विक्रम धनाजी शिंदे ह्यांची नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष व प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशिर्वादाने तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ना. श्री. जयंतरावजी पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, विधी मंडळ पक्षनेता मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नवी मंबईचे प्रभारी माजी मंत्री श्री. शशिकांतजी शिंदे साहेब, नवी मुंबईचे निरिक्षक मा. श्री. प्रशांत पाटील साहेब यांच्या शिफारशीवरून व नवी मुंबईचे समन्वयक मा. खासदार श्री. आनंदजी परांजपे साहेब यांच्या सुचनेवरून हि नियुक्ती करण्यात आली.
राजू भैया ह्यांचा नवी मुंबईच्या राजकारणामध्ये मोठा दबदबा आहे. आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी असणाऱ्या इतर नेत्यांनी सुद्धा राजू भैया ह्यांचा धसका घेतला आहे. राजू भैया ह्यांच्या नियुक्तीने नवी मुंबई च्या राजकारणामध्ये आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला बळकटी व मजबूती मिळेल तसेच राजू भैया ह्यांच्या दांडग्या अनुभवाचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला, पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत होईल.
नवी मुंबई वार्ताशी बोलताना राजू भैया ह्यांनी सांगितले कि, “माझी नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदी व प्रवक्ते पदी निवड करण्यात आली त्याबद्दल मी सर्वाचा आभारी आहे. माझ्यावर विश्वास ठेवून जी संधी मला दिली त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे व येणाऱ्या काळात निश्चिततच मी सर्व सामान्य जनतेसाठी भरीव काम करुन पक्ष मजबूत करेन. नवी मुंबई नागरिकांसाठी नेहमी मी प्रयत्नशील असें.”
ह्यावेळी अशोक अंकुशराव गावडे (नवी मुंबई जिल्हाध्यक्ष), प्रोफेसर नारायण खारझे, संदीप सुतार, संतोष अहेर, अजित सावंत, सतनाम सिंग, नितीन चव्हाण, सचिन पाटील, विजया कदम, निर्मला वायकर, अक्षय बोरडे, परदेशी मॅडम व डॉ. संतोष खांबाले आदी मान्यवर उपस्थित होते.
थोडक्यात असे म्हटले जाते कि राजू भैया नवी मुंबई, वाशी सेक्टर १५/१६ मधील राजकीय वजन असलेले व्यक्तिमत्व आहे. ह्या कोरोना काळात त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. जसे वाशी येथील हिरानंदानी रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द करा हा विषय असेल किंवा नेरूल मधील लिकेजच्या समस्याबाबत प्रश्न असतील, डेंगू व इतर डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे धुरीकरण करणेबाबत प्रश्न असतील, “धुरीकरण, आणि ऑईलिंग” असेल.
कोव्हीड काळातील डॉक्टर व नर्सेस ह्यांची जी भरती झाली त्यांचे प्रकरण असेल, काही दिवसापूर्वी सेक्टर ९ येथे आग लागली होती; कर्तव्यदक्ष नगरसेवक व सामाजिक बांधिलकी जपणारे राजू भैया ह्यांनी त्वरित अग्निशामक विभागाला सुचना देऊन लगेच बोलावून घेतले व आग विझविण्यात यश मिळवले, कोव्हीड काळात फ्री मास्क वाटणे तसेच सॅनिट्झर असेल; कोणाला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे असेल, खास करून तरुण मुलांमध्ये खेळाची वृत्ती वाढावी यासाठी मैदाने साफ करून घेणे, मुलांची लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत राजू भैया चे काम पोहोचलेले दिसते. प्रत्येकाला हा आपला माणूस आहे असे वाटून तसे नाते दृढ झालेले दिसते. प्रत्येक जातीच्या सणांमध्ये सहभागी होणे, प्रत्येकाला मदत करणे, कामाचा किडा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राजू भैया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे करून आपला दबदबा कसा आहे ते प्रतिस्पर्धी पक्षाला दाखवून देतील.