नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील सहकारी गृहनिर्माण संस्थेकरीता “Break the chain Modified Guidelines” अंतर्गत आयुक्त अभिजीत बांगर ह्यांचे आदेश
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड – १९ पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला असला तरी अद्यापही कोविड रुग्ण आढळून येत असल्याने राज्य शासनाकडील संदर्भ क्र. ५ च्या “Break the chain Modified Guidelines” अंतर्गत लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेसह कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी खंडीत करण्याच्या दृष्टीकोणातून सुधारित निर्बंध लागू करणे आवश्यक आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोविड – १९ चा प्रादुर्भाव विचारात घेता, साथरोग नियंत्रण अधिनियम, १८९७ च्या कलम २ अन्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या सर्व संबंधित तरतूदींसह प्राप्त अधिकारांचा वापर करुन आयुक्त अभिजीत बांगर ह्यांनी ‘नवी मुंबई महानगरपालिका या आदेशान्वये कोविड – १९ प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोणातून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील सहकारी गृहनिर्माण संस्थेकरीता “Break the chain Modified Guidelines” अंतर्गत खालील सुधारित निर्बंध पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील असे जाहीर केले.
a)कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेत वेळोवेळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास सदर सहकारी गृहनिर्माण संस्था Hot Spot म्हणून घोषित केली जाईल व सदर गृहनिर्माण संस्थेमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक राहील.
b)अशा गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या प्रवेशव्दारावर अभ्यागतांना प्रवेश बंदी असलेबाबतचा फलक लावणे बंधनकारक असेल.
c)सोसायटीमध्ये तयार करण्यात आलेल्या Hot Spot क्षेत्रामध्ये कोणत्याही नागरिकाचा प्रवेश व बाहेर जाणे याबाबत सोसायटीमार्फत प्रतिबंध घालण्यात यावेत.
d)नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कोविड -१९ प्रतिबंधक उपाययोजनेकरीता येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारामार्फत नियुक्त कर्मचारी यांना सहकारी गृहनिर्माण संस्थेत प्रवेश देणे बंधनकारक राहील.
e)जर एखादया गृहनिर्माण संस्थेने उक्त नमूद निर्देशांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस रक्कम रुपये १०,०००/- दंड करणेत येईल व दुसऱ्या वेळेस रक्कम रुपये २५,०००/- व तिसऱ्या वेळेपासून पुढे प्रत्येक वेळी रुपये ५०,०००/- इतका दंड आकारण्यात येईल.
उक्त आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती / संघटना / संस्था यांचेवर साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० अन्वये तसेच भारतीय दंड संहिता यामधील कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रेस्टॉरन्ट, भोजनालये व इतर आस्थापना सुरु ठेवणेबाबत सुधारित आदेश:
संदर्भ क्र. ८ च्या आदेशानुसार मा. मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील रेस्टॉरन्ट आणि भोजनालये हे मध्यरात्री म्हणजेच रात्री १२.०० पर्यंत सुरु ठेवणेबाबत व इतर आस्थापनांसाठी रात्री ११.०० वाजेपर्यंत कोविड – १९ सुरक्षा नियमांचे पालन करुन सुरु ठेवणेबाबत परवानगी देण्यात आलेली आहे.
शासन आदेश: ब्रेक द चेन अंतर्गत – राज्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरु करण्याबाबत: ज्याअर्थी, राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ व आपत्ती निवारण कायदा, २००५ ची अंमलबजावणी सुरु आहे. त्याअर्थी, साथरोग अधिनियम, १८९७ च्या खंड – २ नुसार प्राप्त अधिकार व आपत्ती निवारण कायदा, २००५ नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून अध्यक्ष, राज्य व्यवस्थापन समिती यांना मिळालेल्या अधिकारानुसार या आदेशाद्वारे खालील निर्देश पारित करीत आहे.
१)राज्यातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज दि. २२/१०/२०२१ पासून सुरु करण्याची मुभा या आदेशाद्वारे देण्यात येत आहे.
२)या आदेशाद्वारे फक्त मोकळ्या जागेतील कोरडया राईडस (dry rides) साठी परवानगी देण्यात येत आहे. यामध्ये पाण्यातील राईडस (water rides) साठी सक्त मनाई आहे.