नवी मुंबईतील 56 क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक यांचे कोव्हीड 19 लसीकरण
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे यांच्या संयुक्त विदयमाने ‘ऑलिम्पिक डे’ च्या निमित्ताने भारत देशाचे प्रतिनिधित्व करणा-या महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
यामध्ये राज्यातील 18 वर्षावरील राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कोव्हीड लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबईतील राज्य, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार कोव्हीड लसीकरणाचे विशेष सत्र नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये आकांक्षा बरजे, जोयल जॉन, तेजस कदम, मदन झा, शक्तीसिंग यादव, रिध्दी शेट्टी, यशमिता म्हात्रे, नागेश राजभर, सचिन ठाकूर, विघ्नेश मोहन, इशिता सुर्वे अशा 11 राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविलेल्या खेळाडूंसह राज्यस्तरावरील 32 खेळाडूंनी लसीकरणाचा लाभ घेतला. अशाप्रकारे 43 खेळाडूंसह खेळाडूंना प्रशिक्षण देणारे 13 क्रीडा प्रशिक्षक अशा एकूण 56 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले, क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, ठाणे तालुका क्रीडा अधिकारी श्री. जुबेर शेख व श्रीम. सुचिता ढमाले यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.