नवी मुंबई

नमुंमपा क्षेत्रातील सन 2023-24 मधील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 31 मार्च, 2023 अखेर खालील प्राथमिक शाळा शासनाची, नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खालील 5 शाळा मान्यतेशिवाय सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या स्वाक्षरीने जाहीर प्रकटन प्रसिध्द केले असून शाळा तात्काळ बंद करावी असे जाहीर केले आहे.

अ.क्र.संस्थेचेनांवशाळेचेनांव व पत्तामाध्यम
1इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट, मुंबईअल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज, सेक्टर-8 बी, सी.बी.डी. बेलापूर.इंग्रजी
2ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, आग्रीपाडा, मुंबईइकरा ईस्लामिक स्कुल ॲण्ड मक्तब, सेक्टर-27, नेरूळइंग्रजी
3द आटपाडी एज्युकेशन सोसायटीचेद ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल (CBSE), सीवूड, सेक्टर-40, नेरूळ.इंग्रजी
4ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळ, किसननगर नं. 3, ठाणेसरस्वती विद्यानिकेतन स्कुल, सेक्टर -5, घणसोलीइंग्रजी(न्यायप्रविष्ठ प्रकरण याचिका क्र. 9166/2015)
5इलिम फुल गोस्पेल ट्रस्ट, ऐरोलीइलिम इंग्लिश स्कुल, आंबेडकर नगर, रबाळेइंग्रजी

संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या म.न.पा. किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगी शिवाय सुरू केलेली शाळा तात्काळ बंद करावी, अन्यथा त्यांच्याविरुध्द बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 18 (5) नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सूचित करण्यात आले आहे.

या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजीकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा. जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button