नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
उरण दि. 3 (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायत मधील तमाम कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता दिनांक 1 मे 2022 पासून बेमुदत संप पुकारला होता त्यात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला त्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानत दिनांक 3 मे 2022 पासून सदर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी केली.
दिनांक 2 मे 2022 रोजी मंत्रालयातून आलेल्या बोलावण्या नुसार मंत्रालयात जाऊन प्रभारी प्रधान सचिव, अवर सचिव मा. सहस्त्रबुद्धे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेरावजी यांचे पी .एस. खदगावकर, आयुक्त तथा संचालक, नगरपालिका प्रशासन संचालनालय कार्यालयातील अधिकारी यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार व संघटनेच्या मागण्यांसंदर्भात वित्त विभागाशि संबंधित, नगर विकास विभागाचे संबंधित व इतर विभागाचे संबंधित मागण्यांच्या फाइल्स सकारात्मक रित्या प्रस्तावित केलेल्या दिसल्याने व संघटनेच्या मागण्या मार्गी लागत असल्याने तसेच दिनांक 4 मे 2022 व 5 मे 2022 रोजी नगर विकास मंत्री मा. ना. एकनाथ शिंदे भेट देणार असल्याने व तदनंतर बैठक देणार असल्याने तसेच उपसचिव नगर विकास विभाग यांचे पत्र अवलोकन करता, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा विचार करता तसेच शासनाने संप स्थगित करण्याचे आव्हान केल्याने, शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कृती समितीने आज झालेल्या बैठकीत असा निर्णय घेतला आहे की दिनांक 1 मे 2022 रोजी पासून पुकारलेला बेमुदत संप दिनांक 3 मे 2022 च्या मध्यरात्रीपासून स्थगित करण्यात येत असून संघटनेच्यावतीने कर्मचार्यांच्या मागण्या करता सतत पाठपुरावा करण्यात येईल.
अशी माहिती सुरेश पोसतांडेल प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना यांनी दिली आहे.