महावितरण भांडूप परिमंडलातील अलिबाग विभागात रक्तदान शिबिर अलिबाग विभागातील अधिकारी – कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढत असून सध्या राज्यात रक्तसाठा कमी होत चालला आहे. अनेक माध्यमातून सरकार रक्तदान करण्याचे आवाहन केले असून महावितरणच्या भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर व अधीक्षक अभियंता श्री. दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २८ एप्रिल २०२१ रोजी सिव्हील रुग्णालय अलिबाग यांच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन अलिबाग विभागातील चेंढरे कार्यालयात करण्यात आले.
दि. १ मे २०२१ पासून वयोगट १८ ते ४४ पर्यंतच्या लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करण्यासाठी महावितरण भांडूप परिमंडलतर्फे सर्व कर्मचार्यांना आवाहन करण्यात आले होते. या अनुषंगाने अलिबाग विभागातर्फे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात अलिबाग विभागातील अलिबाग १, अलिबाग २ व पेण उपविभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच कंत्राटदारांनी रक्तदान केले. सदर शिबिरात रक्तदान १२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक एकता, बंधुत्वाचे स्मरण करून दिले.
या कार्यक्रमासाठी यशस्वी आयोजनासाठी अलिबाग विभागातील कार्यकारी अभियंता श्री. कुंदन भिसे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री इनामदार तसेच उपकार्यकारी अभियंता श्री. मोतीराम राख, शाखा अभियंते श्री. चेतन भोईर, श्री. विशाल सूर्यवंशी, श्री. जाधव, श्री. राकेश गोलवड व श्री. निलेश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
“सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या रक्ताच्या तुटवड्यामुळे राज्य सरकार विविध माध्यमातून रक्तदान करण्यासाठी लोकांना आवाहन करत आहे. त्या अनुषंगाने महावितरण भांडूप परिमंडलात तात्काळ निर्णय घेवून आम्ही आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यापूर्वी ९ एप्रिल रोजी भांडूप परिमंडल कार्यालायात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महावितरण भांडूप परिमंडलाकडून कमीत कमी २०० लोकांचे रक्तदान करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार होतो, त्यामुळे दोन्ही उपक्रमामुळे उद्धिष्ट पूर्ण झाले असून पुढेही अशा सामाजिक कार्यात महावितरण योगदान देणार” असे भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर म्हणाले.