चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांच्या हस्ते कलाकारांना अन्नधान्य वाटप
मुंबई, दि. 31- राज्यात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्याने बॅक स्टेज कलाकारांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन अरविंदो मीरा संस्थेच्यावतीने वडाळा येथील पाच उद्यान या ठिकाणी अभिनेत्री नयन पवार यांच्या हस्ते कलाकारांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
लॉक डाऊन मुळे राज्यात कारखाने, कंपन्या तसेच नाट्यगृह चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गरीब, मजूर, तसेच बॅक स्टेज कलाकारांची उपासमार होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अरविंदो मीरा संस्थेच्यावतीने बॅक स्टेज कलाकारांना अभिनेत्री नयन पवार यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. वडाळा येथील पाच उद्यान या ठिकाणी हा वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी समाजसेवक रत्नाकर खानविलकर व दिनेश सातपुते यांची विशेष उपस्थिती होती.