क्राइम

मोटार कार भाडयाने घेवुन फसवणुक करणा-या आरोपीला दुबईत पळुन जाण्याच्या तयारीत असताना अटक:

रॉयल कार सेल्फ ड्राईव्ह नावाची कंपनी नव्याने चालु करून त्याची जाहीरात करून वेगवेगळ्या इसमांना मोठया भाडयाचे अमिष दाखवून त्यांच्या नवीन – नवीन कार भाड्याने घेवुन दोन-तीन महीने भाडे देवुन त्यानंतर सदरची कार ही परस्पर कोणासतरी गहाण ठेवणे अशा घटना घडत होत्या. वाशी पोलीस ठाणे हददीतील ड्राईव्ह ईजी कार कंपनीच्या २५ कार भाड्याने घेउन त्यांना भाडे व कार परत न देता त्या कारचं अपहार केल्याचा गुन्हा वाशी पोलीस ठाणेत दिनांक १८/०९/२०२१ रोजी नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे अनुशंगाने मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास चालु करण्यात आला होता.

यातील तक्रारदार नामे इम्रान बेग हे ड्राईव्हईजी कंपनीत मॅनेजर या पदावर काम करत होते. सदर कंपनीही त्यांचे गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करीत असुन त्यांचे मुख्यालय चैन्नई येथे असुन त्यांची शाखा सेक्टर ३० ए, वाशी, नवी मुंबई येथे आहे. कोरोना या साथीचे आजारामुळे देशभरात लागलेल्या लॉकडाउन मुळे ड्राईव्ह ईजी कंपनीचा व्यवसाय पुर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे कंपनीत काम करणा-या अनेक कामगारांना काढुन टाकण्यात आले होते.

सदर कामगारपैकी ओम उपाध्याय याचे ओळखीचा संदीप रघु शेटटी याने ड्राईव्ह ईजी कंपनीच्या २५ छोटया-मोठया कार ठरलेल्या रकमेवर जुलै २०२१ भाड्याने घेतल्या होत्या. सदर कारचे दोन महीने वेळेवर भाडे देवुन ऑगस्ट २०२१ पासुन भाडे व कार परत देण्यास संदीप शेटटी नकार देवु लागला. त्यामुळे संदीप शेटटी याने ड्राईव्ह ईजी कंपनीची अपहार करून फसवणुक केल्याची उघड झाल्याने कंपनीचे मॅनेजर इम्रान बेग यांनी दिलेल्या तक्रारी वरून वाशी पोलीस ठाणे गु.र.नं. ३२४/२०२१ भादवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीचा तांत्रिक व गुप्त बातमीदार यांचे मदतीने तपास करून त्यास तात्काळ शिताफीने त्यास अटक करण्यात आली आहे.

तपास :
तपासादरम्यान सदर आरोपीने ड्राईव्ह ईजी कंपनीच्या कार हया वेगवेगळया इसमाकडे लाख-दोन लाख रुपये घेवुन गहाण ठेवल्या होत्या. तसेच सदरच्या रकमा घेवुन आरोपी हा दुवई येथे पलायन करण्याच्या तयारीत होता. तसेच आरोपीने सदरच्या गाडया हया भिवंडी, पडद्या, तळोजा, हैद्राबाद, जळगाव, बदलापुर येथे वेगवेगळया इसमांना त्यांचेकडुन लाख-दोन लाख रूपये रकमा घेवुन गहाण ठेवल्या होत्या. सदरच्या कार हया महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात तसेच परराज्यात असल्याने सदर कार शोधणे अंत्यत क्लिष्ट व जिकरीचे होते. परंतु तपास पथकाने कठोर मेहनत घेवुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली २३ कार गुन्हयाचे तपासकामी जप्त केलेल्या आहेत. तसेच आरोपीने सदरच्या कारच्या टुरिस्ट नंबर प्लेट बदलुन व्हाईट नंबर प्लेट लावुन गहाण ठेवल्याचे तपासादरम्यान सिध्द झाले आहे. तसेच गुन्हयाचा तपास चालु असताना अनेक इतर तक्रारदार यांनी त्यांच्याही कार आरोपी संदीप शेटटी याने वर नमुद कार्याप्रणाली प्रमाणे चालवण्यास घेवुन फसवणुक केल्याचे उघड झाल्याने त्याबाबत ही खांदेश्वर पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपीने लोंकाच्या लॉकडाउनमधील मानसीकतेचा फायदा घेवुन गाडया भाड्याने घेण्याचा बहाणा करून लोकांना परस्पर गाड्या गहाण ठेवुन त्यांचेकडुन अंदाजे ५० ते ६० लाख रूपये गोळा केले होते. आरोपी हा खारघर येथे उच्चभ्रु वस्तीत भाडयाने राहत होता व ऐशआरामी जीवन जगण्यात खर्च करत होता. नमुद आरोपी संदीप रघु शेटटी हा दुबईत जाण्यासाठी मुंबईत विमानतळाकडे जाण्याच्या तयारीत असताना त्यास ताब्यात घेण्यात आले. नमुद आरोपीकडुन मारुती सुझुकी, महींद्रा, टाटा, होंडा अशा वेगवेगळया कंपनीच्या एकुण २३ कार (चारचाकी वाहने) एकुण रक्कम ७२,९०,०००/- रूपये कीमतीच्या कार हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सदर आरोपी बरोबर आणखी कोणी साथीदार आहे काय? या दृष्टीने तपास करण्यात येत असुन अशा प्रकारे फसवणुक झालेल्या लोकानी तक्रार देणेकामी पुढे येण्याचे अहवान करण्यात आले आहे.

आरोपीचे नाव : संदीप रघु शेटटी, वय ३५ वर्षे, धंदा – नाही, रा. रूम नंई १३०१, साई मन्नत, प्लॉट नं ०१, सेक्टर ३४ खारघर, पनवेल, रायगड

उघडीस आलेले गुन्हे :
१) वाशी पोलीस ठाणे गु.र.नं ३२४/२०२१ भादवि कलम ४२०,४०६,४७१,४६८
२) खांदेश्वर पोलीस ठाणे गु.र.नं २०९/२०२१ भादवि कलम ४०६,४२०

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. बिपीनकुमार सिंह, मा. पोलीस सह. आयुक्त डॉ. जय जाधव, मा. पो. उप आयुक्त (गुन्हे) नवी मुंबई श्री. सुरेश मेंगडे, मा. पो. उप आयुक्त परिमंडळ – १, वाशी, नवी मुंबई श्री. विवेक पानसरे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. विनायक आ. वस्त यांच्या मार्गदर्शना खाली वाशी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद तोरडमल (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन ढगे, पोलीस नाईक – सुनिल चिकणे, विनोद वारींगे, अमोल पाटील पो. अमंलदार – गोकुळ ठाकरे, दिलीप ठाकुर, केशव डगळे, मपो अंमलदार – मानसी लाड यांनी यशस्वी पणे पार पाडलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button