गोवठने येथील आई भवानी गावदेवी माते चा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
उरण दि 28 (विठ्ठल ममताबादे) चैत्र कृष्ण 11 मंगळवार दि. 26/4/2022 व चैत्र कृष्ण 12 बुधवार दि. 27/4/2022 रोजी उरण तालुक्यातील गोवठने गावात आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मंगळवार दि 26/4/2022 रोजी सकाळी 6 वा अभिषेक व आरती, रात्री 9 वा. जागरण, रात्री 11:45 वा महाआरती, बुधवार दि 27/4/2022 रोजी पहाटे 4 वाजता महाअभिषेक व आरती व पहाटे 5 वाजल्यापासून देवदर्शन असे विविध धार्मिक उपक्रम उत्साहात संपन्न झाले.
सरपंच प्रणिता म्हात्रे, माजी उपसरपंच समाधान म्हात्रे, उत्सव कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत म्हात्रे, सदस्य-श्रीकांत म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, ओमकार म्हात्रे, समीर म्हात्रे, शीतल म्हात्रे, रविंद्र म्हात्रे यांनी तसेच मंदिर व्यवस्थापन कमिटी, विश्वस्त देऊळ व मधली आळी, व गोवठने ग्रामस्थांनी विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.