पावसाळा कालावधीपूर्व वृक्ष / वृक्षांच्या फांद्या छाटणीबाबत जाहीर आवाहन:
नवी मुंबई महापालिकेमार्फत पावसाळ्यापुर्वीची तयारीचा भाग म्हणून अनेक कामे सुरु करण्यात आलेली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात वृक्षांच्या फांद्यांची छाटणी न केल्यामुळे गृहनिर्माण संस्था / खाजगी संस्था / खाजगी आस्थापना या ठिकाणी वृक्षांच्या फांद्या तुटून पडणे, वाऱ्या वादळात वृक्ष उन्मळून पडणे इत्यादी दुर्घटना घडून वित्तीय हानी होत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. त्याअनुषंगाने पावसाळ्यामध्ये अशा दुर्घटना होऊ नये या दृष्टिकोनातून सदर बाबी नियंत्रणात राहण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयाच्या वतीने पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.
“सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था/खाजगी संस्था/खाजगी आस्थापना यांनी आपल्या परिसरात असलेल्या वृक्षांची पहाणी करुन आवश्यकतेनुसार वृक्षांच्या छाटणी करणेसाठी आवश्यक असलेली परवानगी तातडीने मिळण्याकरीता खाली नमूद विभाग कार्यालयात रितसर अर्ज करुन परवानगी उपलब्ध करुन घ्यावी”
अ.क्र. विभाग कार्यालय दुरध्वनी क्रमांक
1. अे विभाग बेलापूर 022 27570610
2 बे विभाग नेरुळ 022 27707669
3 सी विभाग वाशी 022 27655370
4 डी विभाग तुर्भे/सानपाडा 022 27834069
5. ई विभाग कोपरखैरणे 022 27542406
6. एफ विभाग घणसोली 022 27692489
7. जी विभाग ऐरोली 022 27792114
8. एच विभाग दिघा 022 27769410
या कार्यालयांकडून प्राप्त होणारी परवानगी ही केवळ 2 महिने या कालावधीसाठीच वैध राहील. तसेच वृक्ष छाटणी परवानगी प्राप्त झाल्यानंतर तातडीने वृक्षांची छाटणी करुन घ्यावी.