“मास्टरमाईंड नॅशनल चॅम्पियनशिप” स्पर्धेमध्ये नवी मुंबईच्या स्वरांश कोळी याची नेत्रदीपक कामगिरी:
नवी मुंबई प्रतिनिधी : २०२०-२१ मध्ये पार पडलेल्या “मास्टरमाईंड नॅशनल चॅम्पियनशिप” स्पर्धेमध्ये बेलापूर, नवी मुंबईच्या स्वरांश कोळी याने नेत्रदीपक कामगिरी करून भरघोस यश मिळवून मास्टरमाईंड नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळवून सलग तिसऱ्यांदा आपले स्थान कायम राखून विजयाची हॅट्रिक करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धीचा व कौशल्याचा ठसा उमटवून नवी मुंबईचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेला बहुमान कायम राखून ठेवला.
स्वारांश कोळी या विद्यार्थ्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. स्वारांश कोळी याने प्रथम शालेय स्तरीय व त्यानंतर राज्यस्तरीय अशा दोन्ही परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून भरघोस यश मिळवून मास्टरमाईंड नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आपले स्थान कायम राखून ठेवले. या स्पर्धेसाठी विविध राज्यातून हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये स्वारांश कोळी या विद्यार्थ्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला तीन गौरव चिन्ह, एक रौप्य पदक व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.
त्यावेळी मास्टरमाईंड संस्थेचे संस्थापक श्री. बिपिन चेडडा, भारती विद्यापीठ शैक्षणिक संस्थेचे डायरेक्टर डॉ. विलासराव कदम, प्राचार्य – श्री. आलोक शर्मा, मुख्याध्यापिका रश्मी कुलकर्णी, पर्यवेक्षक जस्विंदर कौर, श्रीमती. पूनम सिंग, श्रीमती. फेल्सिया सालिन्स, शिकवणी शिक्षिका साबिया खान व संपूर्ण भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाचे कर्मचारी वर्ग उपस्थित राहून आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल त्याचे कौतुक करुन त्याला गौरव चिन्ह व सन्माचिन्ह मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आले.
सदर कार्यक्रम कोरोना प्रतिबंधक नियम व अटी पाळून पर पाडण्यात आला.