मॉन्टेरिया व्हिलेज आयोजित ‘उत्सव महाराष्ट्र’ सोहळा उत्साहात संपन्न
पत्रकार : अश्विनी आगरकर (९३२४७९२७८२)
३० एप्रिल रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील, खालापूर येथे मॉन्टेरिया व्हिलेज मध्ये सांस्कृतिक आणि साहित्यिक महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात डॉ. संतोष बोराडे ह्यांनी आणि त्यांच्या टीमने नृत्य आणि संगीत च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचे वर्णन करणारी नाविन्यपूर्ण स्किट्स यांच्याद्वारे क्युरेट केलेले विशेष कार्यक्रम यावेळी उपस्थितांना पाहावयास मिळाले. याशिवाय यावेळी वारकरी संप्रदायाचे विशेष सादरीकरण सुध्दा सादर करण्यात आले. उपस्थतीत सर्वानी ह्या शो ला भरभरून प्रतिसाद दिला.
मॉन्टेरिया रिसॉर्ट चे व्यवस्थापकीय संचालक राही वाघानी ह्यांनी सांगितले,“३० एप्रिल रोजी माँटेरिया गावात महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, लोककथा आणि समृद्ध इतिहास एका विशेष कार्यक्रमाद्वारे जिवंत केला गेला. यावेळी मॉन्टेरिया व्हिलेजमधील असणारे नियमित उपक्रम आणि आकर्षणांव्यतिरिक्त, ‘उत्सव महाराष्ट्र’ च्या आयोजनातून उपस्थितांना महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहासातील आठवणींना उजाळा मिळाला असून उपस्थितांची यावेळी चांगली दाद मिळाली. यावेळी उपस्थित पाहुण्यांसाठी, विशेषत: लहान मुलांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता.”
या दिवशी लोकसंगीत, नृत्य सादरीकरण, भजन आणि पारंपारिक वाद्यांसह ‘दिंडी सोहळा’ सांप्रदायिक मिरवणूक हे मुख्य आकर्षण पहायला मिळाले. या महोत्सवात लोककला, संत साहित्याचा कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर विशेष प्रबोधनपर सत्रासह इतिहासाच्या सोनेरी आठवणी उपस्थितांनी अनुभवल्या. तसेच नाशिक-ढोल ते लेझीम च्या तालावर उपस्थितांची पावले नाचली. गावातील पारंपरिक खाद्यसंस्कृती सोबतच पाहुण्यांना अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थही चाखायला मिळाले.