महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने तर्फे पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर संपन्न.
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
कोपरखैरणे येथील ज्ञान विकास महाविद्यालयात सकाळी दहा वाजता महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तर्फे पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना चे संस्थापक अध्यक्ष व गृहविभाग पोलीस निराकारण समन्वयक समिती सदस्य मा. राहुल भैया अर्जुन राव दुबाले यांच्या आदेशानुसार नवी मुंबई शहराध्यक्ष व तेजस्व करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मा. निलेश ढाकणे यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आगामी सैन्य, पोलीस भरती व इतर आगामी स्पर्धा परीक्षासाठी विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी कशी करावी. जास्तीत जास्त गुण कसे मिळवावे. लेखी, मैदानी परीक्षा व आहार विषयक मार्गदर्शन अधिकारी वर्गाकडून करण्यात आले.
या शिबिरास प्रमुख मार्गदर्शिका म्हणून मुंबई पोलीस सहाय्यक आयुक्त प्रिया ढाकणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निवारण केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक योगेश देशमुख अँटी करप्शन ब्युरो, ठाणे तसेच त्यांच्यासह निवृत्ती शिंदे पोलीस उपनरीक्षक, देवीदास डमाळे पोलीस उपनिरीक्षक, संजय शिरसाट, नवी मुंबई पोलीस (वाहतूक विभाग) व अनंतराज गायकवाड संपर्कप्रमुख, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, नवी मुंबई. विराज यादव घणसोली, विभागप्रमुख, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, नवी मुंबई आदींसह मोठ्या प्रमाणात संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सरतेशेवटी तेजस्व करिअर अकॅडमी चे संचालक व कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अक्षय आव्हाड यांनी मान्यवरांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांनीही हजेरी लावली होती.