महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिनव उपक्रम; “संविधान प्रास्ताविका” फोटो फ्रेमची सप्रेम भेट
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
पनवेल : २६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्रभर संविधान दिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, जनहित कक्ष व विधी विभागाचे अध्यक्ष ऍड. किशोर भाऊ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सरचिटणीस ऍड. संतोष सावंत तसेच जनहित कक्ष-विधी विभाग पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून पनवेल विधानसभेतील विविध सरकारी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, कॉलेज, सरकारी रूग्णालय यांना “संविधान प्रास्ताविका” फोटो फ्रेम सप्रेम भेट देण्यात आल्या.
सर्व आस्थापनांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष मा. अतुल चव्हाण साहेब, नवी पनवेल शहर अध्यक्ष मा. पराग बालड साहेब, जनहित कक्ष विभाग संघटक श्री. वरून कानडे जनहित कक्ष उपविभाग संघटक श्री. रवींद्र दाभोळकर मनसे कार्यकर्ते जितेंद्र दामुष्टे, ओमकार जागुष्टे, सहील बुगडे, किरण गावडे व हर्षद मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.