महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व अरविंदो मिरा संस्थेकडून सफाई कामगारांना सॅनीटायझर व मास्क वाटप
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व अरविंदो मिरा संस्थेच्यावतीने नेरुळगाव येथील सफाई कामगारांना सेनेटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून सिनेअभिनेत्री व अरविंदो मिरा संस्थेच्या संस्थापक नयन पवार, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक विरेंद्र म्हात्रे, गुरुनाथ नाईक व डॉ. शीतल सातपुते आदी उपस्थित होते.
कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असून रस्त्यावर काम करणाऱ्या सफाई कामगारांना (कोरोना योद्धे) कॊरोना होण्याची जास्त शक्यता असते. त्यांनी केलेल्या कामामुळेच शहर स्वच्छ राहून सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य चांगले राहते. मात्र इतरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष होत असते. ही बाब लक्षात घेऊन लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व अरविंदो मिरा संस्थेकडूनअशा सफाई कामगारांना सेनेटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला अक्षय पाचारने, विक्की वांडे, विलास तांडेल व इतर सदस्य व कामगारांनी हजेरी लावली.