राजकीय

लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्यावतीने मस्जीद ट्रस्ट, मदरशांमध्ये धान्य, खजुराचे वाटप

नवी मुंबई प्रतिनिधी:

लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून रविवारी नवी मुंबईच्या सर्व नोडमधील 41 मस्जिद ट्रस्ट आणि 10 मदरषांमध्ये तांदुळ, डाळ आणि खजूरांचे वाटप स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. त्याचबरोबर कोरोनाचा संकटकाळ देखील सुरू आहे. कोविडच्या बिकट परिस्थितीत सर्वसामान्यांना सणवार साजरा करण्यासाठी ही धान्यरूपी मदत आधार ठरणार आहे, अशी प्रतिक्रीया माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी रबाळे येथे नोंदवली आहे.

लाॅकडाऊनचा फटका सर्वांना बसला आहे. गरीब आणि गरजूंसाठी लोकनेेते नाईक यांनी नेहमीच सहकार्यरूपी हात पुढे केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही सुमारे 1100 टन धान्याचे वाटप त्यांच्यातर्फे गरजूंना करण्यात आले होते. परिवहन समितीचे सदस्य अॅड जब्बार खान यांनी मुस्लीम समाजातर्फे लोकनेेते आ. गणेश नाईक, ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्यासह संपूर्ण नाईक कुटुंबियांचे आभार मानले. मदरसा ओ मस्जिद मदिनतुला अलून ट्रस्ट गणेश नगर चिंचपाडा ऐरोली नाका येथील मस्जिदमध्ये धान्य व खजूर वाटपप्रसंगी ते बोलत होते. अॅड खान यांच्यासमवेत परिवहन समितीचे माजी सभापती वीरेश सिंग, बाबूलाल कुरेशी, मंसूर अली, श्री गवते आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

नवी मुंबईतील मुस्लीम समाज नेहमीच नाईक परिवाराच्या कल्याणाची दुवा करीत आला आहे. नाईक परिवाराच्या माध्यमातून नवी मुंबई शहराची आणखी उत्तम प्रकारे सेवा घडो, अशी सदिच्छा मुस्लीम समाज व्यक्त करीत आहे असे सांगून कोरोना महामारी लवकरात लवकर संपू दे आणि सर्वांचे आयुष्य पुन्हा एकदा हसतं खेळतं होवू दे अशा भावना अॅड. खान यांनी प्रगट केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button