लोकनेते मा. अविनाश दादा लाड यांच्यातर्फे साखरपा – मेघी गावातील गरजू नागरिकांना अन्नधान्याचे किट वाटप
साखरपा: 1 जून – नवी मुंबईचे माजी उपमहापौर आणि लांजा – राजापूर – साखरपातील लोकनेते मा. अविनाश दादा लाड यांच्यातर्फे साखरपा विभागातील मेघी गावचे माजी सरपंच श्री गंगाराम केसरकर यांच्या हस्ते गरजू दहा नागरिकांना अन्नधान्याचे किट आज वाटप करण्यात आले.
दोन वर्षे लाँकडाऊन असल्यामुळे साखरपा विभागातील रोजंदारी करणाऱ्या नागरिकांचा रोजगारच बंद झाला आहे. अनेक नागरिक पुर्वी छोटी मोठी कामे करुन रोजगार मिळवत होती. मात्र या लाकडाऊनमुळे अनेकांची जमविलेली पुंजी संपू लागली आहे. लाँकडाऊन संपेल याची वाट पाहीली जात आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. परिणामी किराणा भरण्याचाही प्रश्न उद्भवत आहे. अशा वेळी लोकनेते मा.अविनाशदादा लाड यांनी प्रत्येक गावातील गरजू नागरिकांना किमान 10 किटचे वाटपाचे आवाहन केले होते. त्यानुसार मेघी गावचे माजी उपसरपंच गंगाराम केसरकर यांना लोकांनी संपर्क केला होता. त्यानुसार मा.अविनाश लाड साहेबांच्या आदेशानुसार गावातील 10 जणांना किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रकाश धावडे, सुरेश करंबेळे, सखाराम करंबेळे, गणपत रबसे, विश्ननाथ वाजे, रमेश वाजे, प्रथमिश महाडिक, सोमा वाझे, सिताराम वाझे, उदय कोळवणकर, राजाराम हेगिष्टे, सखाराम पांढरे आदी उपस्थित होते. लोकनेते मा.अविनाश दादा यांनी केलेल्या मदतीबद्दल गावातील नागरिकांनी आभार मानले आहेत.