उरण येथे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी मानवी साखळी आंदोलन
उरण (दिनेश पवार)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, यासाठी उरण शहर सहतालुक्यातील कार्यकर्त्यांनी या मानवी साखळी आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. जासई येथील दि. बा. पाटील यांच्या पुतळ्या पासून ते उरण येथील उरण नगरपरिषदचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शाळेपर्यंत मानवी साखळी आंदोलन सुरु होते.
उरण नगरपरिषदचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शाळेच्या प्रांगणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अखिल आगरी समाज परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कॉ. जि. एल. पाटील यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून मानवी साखळी आंदोलनाची सांगता समारोप करण्यात आला. त्याचप्रमाणे मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला.
मानवी साखळी आंदोलनात उरणचे आमदार महेश बालदी, उरण तालुका भाजपा अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह भाजपा उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, रायगड जिल्हा ओ बी सी सेल, अध्यक्ष चंद्रकांत घरत, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेवक नंदकुमार लांबे, नगरसेविका प्रियंका पाटील, नगरसेविका दमयंती म्हात्रे, नगरसेविका जानव्ही पंडीत, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, जसिम गॅस, हितेश शाह, हस्तीमल मेहता, सिमा घरत, म्हातवली ग्रामपंचायत सरपंच रंजना पाटील, चारुदत्त पाटील, संतोष ओटावकर, समीर कुथे, नरेश गावंड, मदन कोळी, राजेश कोळी, प्रदीप थळी, सनद पाटील, पुरुषोत्तम सेवक, अभिषेक जैन, सागर मोहिते, मनन पटेल, पपू कोळी, तनुज बालदी, रोहित पाटील, चंद्रकांत गायकवाड, अरविंद पवार, मनोज ठाकूर, कुणाल शिसोदिया, महेंद्र खाडे , यशवंत ठाकूर, विशाल पाटेकर, कुणाल समेळ, नंदा माजगावकर, अजित भिंडे, राजू म्हात्रे, चेतन म्हात्रे, नयना पाटील, विराज म्हात्रे, अंकित म्हात्रे, विलास काठे, हिराजी कांबळे, बाळू पारधी, उद्य म्हात्रे, दीपिका पाटील, अमृता घरत, विनया ठाकूर भगवान घरत, लालू पटेल, राजेश कोळी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.