कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी- एसीपी भागवत सोनावणे

नवीन पनवेल : प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात पोलीस स्टेशन हद्दीतील सरपंच, उपसरपंच, राजकीय, कार्यकर्ते, इतर प्रतिष्ठित नागरिकाची बैठक पनवेल तालुका पोलीस ठाणे, मंथन हॉल याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे (पनवेल)हे उपस्थित होते.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हददित 33 ग्रामपंचायती येतात. यावेळी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांना नवी मुंबई विमानतळाचे नामकरण हे केंद्राच्या अखत्यारीत असून त्याबाबत आपापल्या गावातील नागरिकांना समजावून सांगावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नियमन होणार नाही याची दक्षता घ्यावी. इत्यादी महत्वाच्या सूचना एसीपी भागवत सोनावणे यानी उपस्थिताना दिल्या आणि 29 पदाधिकारींना सी.आर.पी.सी. 149 प्रमाणे प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्या आहेत.
तसेच कोरोना विषाणूच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यानी केले.