पत्रकार नंदू धुरंधर दिग्दर्शित ‘गामा फाउंडेशन फिल्म्स’ च्या “पँनडेमिक – द ब्राईट साईड” चा ‘चलचित्र रोलिंग अवॉर्ड – बंगलोर’ आणि ‘आयकॉनिक शॉर्ट सिने अवॉर्ड’ ने गौरव!
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
‘गामा फाउंडेशन फिल्म्स’ची पहिलीच निर्मित असलेल्या ‘पँनडेमिक – द ब्राईट साईड’ या शॉर्ट फ़िल्मला देशासह जगभरातील विविध आंतराराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक फेस्टिव्हल्समध्ये या लघुपटाचे कौतुक होत आहे. बंगलोर येथील प्रसिद्ध ‘चलचित्र रोलिंग अवॉर्ड, फेस्टिवल’मध्ये “बेस्ट ड्रेमाट्रिक फिल्म”चा आणि ‘आयकॉनिक शॉर्ट सिने अवॉर्ड’मध्ये “बेस्ट प्रोडक्शन” असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यासोबतच ‘वेसूवियस इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल, इटली’ येथेही ‘पँनडेमिक – द ब्राईट साईड’ हा लघुपट अंतिम फेरीसाठी निवडला गेला आहे. तसेच ‘ग्रेट इंडियन शॉर्ट फिल्म फेस्टीवल, कोलकत्ता’ आणि ‘आय सिग्निया फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये “ऑफीशियल सिलेक्शन”चा मान या लघुपटास मिळाला आहे.
‘पँनडेमिक – द ब्राईट साईड’ हा लघुपट गेल्यावर्षी कोरोना काळात चित्रित करण्यात आला होता. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारी ‘गामा फॉउंडेशन फिल्मस’ची ही पहिलीवहिली कलाकृती आहे. आपल्या पहिल्या कलाकृतीला जगभरातील मान्यवरांकडून होणारे कौतुक हुरूप वाढविणारे असून या वर्षीच्या अनेक प्रतिष्ठत महोत्सवांमध्ये हा लघुपट निश्चित आपली किमया दाखवेल अशी खात्री असल्याचे दिग्दर्शक नंदू धुरंदर, निर्माते महेश कालेकर, कथा – संकल्पनाकार आणि अभिनेत्री अमृता देवधर व लेखक – सह दिग्दर्शक निखिल कटारे यांनी व्यक्त केले आहे.
या शॉर्ट फिल्मची निर्मिती “गामा फॉउंडेशन”चे महेश कालेकर यांची असून, कथा आणि संकल्पना अमृता देवधर यांची आहे. त्याचबरोबर या लघुपटाचे दिग्दर्शन नंदू धुरंधर यांनी केले आहे. पटकथा, संवाद लेखन आणि सह दिग्दर्शन निखिल कटारे यांचे आहे. सिनेमॅटोग्राफी मकरंद पांचाळ यांनी केली आहे. तर “पँनडेमिक – द ब्राईट साईड” या लघुपटात अभिनय सुरताल (विलेपार्ले-पूर्व) समूहातील धनंजय शानभाग, महेश अरुर, शलाका अरुर, उल्का कामत, पल्लवी नेरुरकर आणि अमृता देवधर यांनी केला आहे.