वॉर्ड क्रमांक ५९, वाशी मधील समाजसेविका सौ. दर्शना भोईर ह्यांचा अनोखा उपक्रम:
आई माऊली बहुउद्देशीय सामाजिक महिला संघटना, नवी मुंबईच्या संस्थापक अध्यक्षा सौ. दर्शना भोईर यांनी दिनांक १ ऑक्टोबर रोजी जागतिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील मेडिकल स्टाफला फळे, बिस्किटे आणि ज्युस वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सौ. दर्शना भोईर यांनी सांगितले कि, “आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःचे आरोग्य संभाळत असतांना सामाजिक बांधिलकी म्हणुन इतरांना सुध्दा सहकार्य करण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. समाजाचे आपल्यावर ऋण आहे या भावनेतुन हजारो-लाखो रक्तदाते संपुर्ण भारत देशभर ऐच्छीक रक्तदान करत असतात. त्यामुळे या सर्व रक्तदान करणाऱ्या बंधु-भगिनिंना शतशः प्रणाम!” परंतु यामध्ये एक घटक नेहमी दुर्लक्षित राहतो तो म्हणजे रक्तदानाची प्रक्रिया होत असताना संबंधित डॉक्टर्स, नर्स, टेक्निशियनस, वार्ड बॉय आणि इतर कर्मचारी बंधु-भगिनी. त्यामुळे मला एक अनोखी कल्पना मला सुचली. राष्ट्रीय रक्तदान दिनी या दुर्लक्षित मनोभावे सेवा देणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील मेडिकल स्टाफला फळे, बिस्किटे आणि ज्युस वाटपाच्या कार्यक्रमाचे नियोजन करून माझी मैत्रीण सरिता खेरवासिया मॅडम यांच्या मेडिकल स्टाफला ताजी फळे, बिस्किटे आणि फ्रेश ज्युसचे वाटप केले. राष्ट्रीय रक्तदान दिनी रक्तदाता सर्वांच्या लक्षात राहतो पण तुमचे महत्वपुर्ण कार्य कोणाच्याही लक्षात राहत नाही. आजच्या दिवशी तुमच्या सर्वांची मला सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य मानते.”
यावेळी सर्व स्टाफला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सर्व स्टाफने सौ. दर्शना भोईर ह्यांचे आभार मानले.