नवी मुंबई

“ऑक्सिजन नर्स” ठरणार “ऑक्सिजन दूत”

सिडको कोव्हीड सेंटरमधील ऑक्सिजन वापरावर आता “ऑक्सिजन नर्स” ठेवणार लक्ष, ऑक्सिजन बचतीची नवी उपाययोजना:

सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने ऑक्सिजन पुरवठ्यावर काटेकोर लक्ष ठेवण्याप्रमाणेच ऑक्सिजन बचतीसाठीही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ऑक्सिजन बेड्स सुविधा असलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये ऑक्सिजन वापराचे नियमित निरीक्षण व त्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता “ऑक्सिजन नर्स” ची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये आता तिन्ही शिफ्टमध्ये “ऑक्सिजन नर्स” कार्यरत असणार आहेत.

सिडको कोव्हीड सेंटरमधील सध्याची ऑक्सिजनची गरज असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता 4 पुरुष व 3 महिला अशा 7 वॉर्डमध्ये 3 शिफ्टमध्ये 35 ‘ऑक्सिजन नर्सेस’ कार्यरत राहणार असून त्यांचे रितसर प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या ऑक्सिजन नर्स रुग्णाकडे जाऊन त्याची ऑक्सिजन पातळी नियमितपणे तपासतील व त्याच्या नोंदी ठेवतील. रुग्णांच्या गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणाचे कामही या नर्सेसमार्फत केले जाईल.

या ऑक्सिजन नर्स तेथील रुग्णांच्या नाश्त्याच्या व जेवणाच्या वेळेत अथवा रुग्ण प्रसाधनगृहात जाईल अशा वेळेत त्याचा ऑक्सिजन पुरवठा बंद करतील व नंतर लगेच सुरु करतील. ही कार्यवाही काटेकोरपणे करण्याची त्यांची जबाबदारी आहे. रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठा केव्हा बंद केला व नंतर केव्हा सुरु केला याबाबतच्या नोंदी या ऑक्सिजन नर्सेस स्वतंत्रपणे ठेवतील.

याव्दारे ऑक्सिजन मास्क जेव्हा रूग्णाच्या नाकावर नसतो अशा नाश्ता, जेवण, प्रसाधन गृहात जाणे अशा वेळी तेथील ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने ऑक्सिजनची बचत होणार आहे. ऑक्सिजनचे महत्व लक्षात घेऊन ऑक्सिजन बचतीची ही अभिनव संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत असून “ऑक्सिजन नर्स” या बचत ही निर्मिती इतकीच महत्वाची गोष्ट असल्याने ख-या अर्थाने “ऑक्सिजन दूत” ठरणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button