पनवेल मध्ये 24 तास वॉररूम कार्यरत, नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर यांच्या मागणीला यश
पनवेल महानगरपालिकेची वॉर रूम सक्षम व अद्ययावत करून बेड मॅनेजमेंट करण्याच्या नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर यांच्या मागणीला यश आले आहे.
पनवेल महानगरपालिकेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा भार पनवेल महानगरपालिकेवर येत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेडचा शोध घेण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. तसेच शासनाच्या आदेशाप्रमाणे खाजगी रुग्णालयातील 80% बेड हे महानगरपालिकेने हस्तांतरित करून त्यावर कंट्रोल ठेवणे क्रमप्राप्त आहे. हे सर्व करण्याकरता पनवेल महानगरपालिकेची वॉर रूम करण्याविषयी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर यांनी आयुक्त यांना 20 एप्रिल 2021 च्या महासभेमध्ये निवेदन करून मागणी केली होती. तसेच यासंदर्भात आयुक्त यांची भेट घेऊन चर्चा देखील केली होती. सदर मागणी वजा सूचनेची पनवेल महानगरपालिकेने दखल घेऊन आता 24 तास वार रूम कार्यरत करावी. खाजगी व शासकीय रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची माहिती डॅशबोर्डवर दर 8 तासाने अद्ययावत करणे यसंदर्भात पावले उचलली असून 24 तास पथक कार्यरत केलेला आहे.
तरी नागरिकांनी बेड उपलब्धतेसाठी 892893134, 8928931049, 8928931041, 8928931052 वर संपर्क करण्याचे आवाहन नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.