महाराष्ट्र

सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत ज्ञानार्पण सोहळा, ५३ हजार घरांमध्ये पुस्तके भेट देण्याचा नवी मुंबई मनसेचा संकल्प

१४ जून २०२१ रोजी सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवी मुंबई मनसेच्या वतीने ५३ हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी याप्रसंगी केलेला आहे. मराठी १०० पुस्तकांची यादीच मनसेने प्रसिद्ध केलेली आहे. त्यामधील आपल्या आवडत्या पुस्तकाची नोंदणी करण्याचे आवाहन मनसेने केले आहे. सदरच्या पुस्तकांच्या यादीमध्ये सुप्रसिद्ध लेखक/कवी मंगेश पाडगावकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, व.पु.काळे, ना.धों. महानोर, आचार्य अत्रे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, विजय तेंडुलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, महात्मा गांधी, साने गुरुजी, वि.स.खांडेकर, डॉ.अब्दुल कलाम, सुरेश भट अशा कवी/लेखकांच्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये श्यामची आई, फकिरा, अग्निपंख, जिप्सी, शूद्र पूर्वी कोण होते, माझी जीवनगाथा, पार्टनर व.पु.काळे, यशवंतराव आणि मी, वाघनखं, सखाराम बाईंडर, माझी जन्मठेप, नटसम्राट, सत्याचे प्रयोग, रंग आणि गंध, रसवंतीचा मुजरा, शिवछत्रपती एक मागोवा अशा अनेक प्रसिद्ध पुस्तकांची यादी आहे, असे नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

नवी मुंबई मनसेने या अभियानाची सुरुवात केल्यानंतर काही तासातच १५०० पुस्तकांची नोंदणी नवी मुंबईकरांनी केलेली आहे. तसेच सदर पुस्तकांची नोंदणी करण्याकरिता मनसेने दोन क्रमांक ९०९०५०५०६७ / ८१०८१८१००७ प्रसिद्ध केलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपले आवडते पुस्तक नोंदवू शकतात. व्हाट्सअप, क्यू आर कोड, तसेच गुगल लिंकच्या माध्यमातून आपली माहिती देऊन आपले आवडते पुस्तक नागरिक नोंदवू शकतात. नवी मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने या वाचन चळवळीत सहभाग नोंदवून वाचन संस्कृती वृद्धांगित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button