वाशी येथील हिरानंदानी रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द करा – मा. परिवहन सदस्य विक्रम धनाजी शिंदे ह्यांची मागणी
नवी मुंबई प्रतिनिधी : मा. परिवहन सदस्य विक्रम धनाजी शिंदे ह्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, ” नमुंमपा सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथील रूग्ण हिरानंदानी रूग्णालय, वाशी येथे संदर्भित करण्यात येत आहेत. कोविड – 19 च्या अगोदर सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथील रूग्णांकरीता एकूण 15 खाटा आरक्षित ठेवण्यात आलेल्या होत्या परंतु सदयस्थितीत हिरानंदानी रूग्णालय काही अंशी कोविड रूग्णालय असल्याचे कारण देवून सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथील फक्त 07 रूग्णांकरीता खाटा उपलब्ध करून देण्यात येतात. सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथील रूग्णसंख्या पाहता करारनूसार एकूण 15 खाटा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहेत. हिरानंदानी हे काही अंशी कोविड रूग्णालय आहे परंतु हिरानंदानी हे रूग्णालय कोविड रूग्णांकरीता कोणत्याही प्रकारची सवलत न देता संपुर्णपणे आर्थिक व्यवहार करीत आहे.
त्यामुळे केवल हिरानंदानी यांचे आर्थिक हितसंबंधाकरीता सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथून संदर्भित होणाऱ्या रूग्णांवर अन्याय होत असून त्यांना वैदयकिय सुविधा मिळत नाहीत. आपणांस विनंती करण्यात येते की नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये सदयस्थितीत उपलब्ध असलेले खाजगी कोविड रूग्णालय जसे की M.G.M. वाशी, अपोलो रूग्णालय, बेलापूर, रिलायन्स हॉस्पीटल कोपरखैरणे इत्यादी या रूग्णालयांमध्ये कोविड रूग्ण आर्थिक व्यवहार करून उपचार घेवू शकतात त्यामुळे हिरानंदानी रूग्णालय, वाशी यांची कोविड मान्यता रद्द करण्यात यावी जेणेकरून कोविडचे कारण न देता सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथील रूग्णांना हिरांनदानी रूग्णालयाकडून पूर्ण क्षमतेने रूग्णालयीन सेवा देता येईल.”