घणसोली विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील सत्यवान नगर, खदान तलाव लगत, गोठीवली तसेच मदन हाईटस जवळ, घर नं. 746 जवळ, गोठीवली, पटेल वखारीमागे त्याचप्रमाणे गणेश नगर नाल्या लगत, समर्थनगर, घणसोली, नवी मुंबई याठिकाणी विनापरवानगी अनधिकृतपणे आरसीसी जोत्याचे काम प्रगतीपथावर होते.
या तिन्ही बांधकामधारकांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीसा बजाविण्यात आलेल्या होत्या. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
या अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-12, ब्रेकर-3, जेसीबी-1, गॅस कटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापूढे देखील अशाप्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.