घणसोली विभागात अनधिकृत बांधकामावर कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज तलावाचे लगत उत्तरेस, घणसोली याठिकाणी विनापरवानगी अनधिकृतपणे आरसीसी जोत्याचे काम प्रगतीपथावर होते. तसेच दत्तनगर, दत्त मंदिरासमोरील बाजूस, घणसोली याठिकाणीदेखील विनापरवानगी अनधिकृतपणे आरसीसी जोत्याचे काम प्रगतीपथावर होते. या दोन्ही बांधकामधारकांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार दोनही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-12, ब्रेकर-3, जेसीबी-1, गॅसकटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
या पूढे देखील अशाप्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.