नवी मुंबई

घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे याबाबत प्रतिबंधात्मक कारवाया तीव्रतेने राबविण्यात येत असून आज घणसोली विभाग कार्यक्षेत्रामधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. घणसोली विभागातील जिजामाता नगर, घणसोली गांव येथे नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे आरसीसी जोत्याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामास घणसोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. नोटिशीस अनुसरून संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू संबंधितांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.

या अनधिकृत बांधकामाविरोधात घणसोली विभागामार्फत धडक मोहीम आयोजित करीत हे बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर 11, ब्रेकर 3, गॅस कटर 1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते. संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अशा प्रकारच्या अतिक्रमण / अनधिकृत बांधकामविरोधी मोहीमा अधिक तीव्र स्वरूपात राबविण्यात येणार आहेत.

जाहिरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button