घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घणसोली कार्यक्षेत्रातील अर्जुनवाडी येथे आरसीसी तळ मजल्याचे व जोत्याचे काम महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधकामे सुरू होती. या बांधकामास घणसोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. नोटीशीस अनुसरून हे अनाधिकृत बांधकाम संबंधितांनी स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी अनाधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामांवर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आजोयन करण्यात आलेले होते. त्यानुसार दोन्ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर 10, ब्रेकर 2, गॅस कटर 1, जेसीबी 1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.