नवी मुंबई
सर्वसाधारण बसमार्ग क्र.48 पनवेल रेल्वे स्थानक (प) ते रिलायन्स कंपनी / रसायनी यामार्गाचा विस्तार
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा सर्वसाधारण बसमार्ग क्र.48 पनवेल रेल्वे स्थानक (प) ते रिलायन्स कंपनी / रसायनी मार्गे दांडफाटा – पिल्लई कॉलेज असा कार्यान्वित आहे. सदर मार्गात दिनांक 04/12/2021 पासून पनवेल रेल्वे स्थानक (प) ऐवजी सिबीडी बस स्थानक ते रिलायन्सी कंपनी / रसायनी ऐवजी वाशिवली गांव (रसायनी) असा विस्तार करण्यात येत आहे.
बस मार्गाची संक्षिप्त माहिती –
1. | प्रवास मार्ग | सिबीडी बस स्थानक, बेलपाडा गांव / खारघर रेल्वे स्थानक, स्पॅगेटी / घरकुल, कामोठे गांव / के.एल.ई.कॉलेज, आसुडगांव आगार, ठाणा नाका, पनवेल रेल्वे स्थानक (सर्कल), भिंगारी, हॉटेल राहुल पार्क, कोनगाव, शेडुंग, ठोंबरेवाडी / गोदरेज सिटी, बारवईगाव, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालय, भटवाडी / साई निवास, पानसील गाव, पिल्लई कॉलेज (चार फाटा), खाने आंबिवली, रिलायन्स गेट 2 / कैरे शिवाजी नगर, रिलायन्स कंपनी / रसायनी, रिलायन्स पेट्रोल पंप, बोरीवली गांव, वाशिवली वाडी, वाशिवली गांव. |
2. | बस संख्या | 07 |
3. | प्रस्थानांनतर | 30 ते 35 मिनिटे |
4. | पहिली बस | सिबीडी बस स्थानक 06.30 वाशिवली गांव / रसायनी 07.00 |
शेवटची बस | सिबीडी बस स्थानक 19.50 वाशिवली गांव / रसायनी 21.20 |
तरी सदर बस सेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत करण्यात येत आहे.