फ्युचर फर्स्ट अकॅडमी – फिटनेस फॉर जनरेशन्स चा ७वा वर्धापनदिन लोकनेते श्री. गणेश नाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न:
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी फ्युचर फर्स्ट अकॅडमी – फिटनेस फॉर जनरेशन्स ला ७ वर्षे पुर्ण झाली व दस्तुरखुद्द नवी मुंबईचे सर्वेसर्वा आदरणीय लोकनेते श्री. गणेश नाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ७वा वर्धापनदिन बेलापुर येथील फ्युचर फर्स्ट अकॅडमी या सेंटरमध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी लोकनेते श्री. गणेश नाईक साहेब ह्यांनी सांगितले कि “फ्युचर फर्स्ट अकॅडमी – फिटनेस फॉर जनरेशन्स च्या हर एक नोड मध्ये शाखा झाल्या पाहिजेत जेणेकरून आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण आपली फिटनेस सांभाळू शकेल.”
यावेळी लोकनेते श्री. गणेश नाईक साहेब ह्यांनी फ्युचर फर्स्ट अकॅडमी – फिटनेस फॉर जनरेशन्स चे संस्थापक अभय वाघमारे ह्यांना पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.
फ्युचर फर्स्ट अकॅडमी – फिटनेस फॉर जनरेशन्स चे संस्थापक अभय वाघमारे ह्यांनी नवी मुंबई वार्ता शी बोलताना सांगितले, “फ्युचर फर्स्ट अकॅडमी – फिटनेस फॉर जनरेशन्स च्या माध्यमातुन हर एक वयोगटातील व्यक्तींपर्यंत फिटनेस ची ओढ लागावी. जेणेकरून प्रत्येकाचे आयुष्य मग ते शारीरिक असुंदे किंवा मानसिक ते सुदृढ राहिले पाहिजेल. भविष्यात फ्युचर फर्स्ट अकॅडमी – फिटनेस फॉर जनरेशन्स च्या प्रत्येक नोड मध्ये शाखा असतील असा माझा मानस आहे.”