“फ्युचर फर्स्ट अकॅडमी – फिटनेस फॉर जनरेशन्स” च्या माध्यमातून ध्येय फिटनेसचे – अभय वाघमारे
अभय वाघमारे ह्यांचे वडील दिवंगत माजी आमदार धोंडीराम वाघमारे ह्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभय वाघमारे यांनी लोकांची सेवा करण्याचा विडा उचलला त्या अनुषंगाने त्यांनी फ्युचर फर्स्ट अकॅडमी हि संस्था तीन वर्षां अगोदर चालू केली आहे, ह्या संस्थेच्या माध्यमातून कित्येक गरीब-गरजू लोकांना त्यांनी मदत केली आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन मध्ये गेल्या वर्षी या संस्थेच्या माध्यमातून गरीब-गरजू वीस हजार कामगारांना जेवणाची सोय केली. या संस्थेने फक्त मनुष्य माणसाला नाही तर प्राणी वर्गाला सुद्धा खूप मदत केली, जसे भटकी कुत्री आहेत, त्यांना बिस्कीट, डॉग फूड, पाणी, दूध, अंडी व ब्रेड हे सर्व जिथे जिथे भटकी कुत्री असतील तिथे तिथे या संस्थेने त्यांना जेवेन उपलब्ध करून दिले. आपले कोरोना योद्धे आहेत जसे डॉक्टर, नर्सेस, पोलीस तसेच सफाई कामगार ह्यांना N९५ मास्क, हॅन्ड सॅनिटायझर, फेस मास्क, फूड बास्केट व प्रथमोपचार किट वितरित केले. जे कॅन्सर लोक आहेत अशा १४० जणांना जेवणाची तसेच त्यांच्या औषधाची, त्यांना मास्क, बेडशीट व मछरदानी आदी गोष्टींची व्यवस्था केली. या संस्थेने आजपर्यंत गरीब-गरजू लोंकाना मदतीचा हात दिला आहे. यापुढे हि संस्था अशाप्रकारे काम करत राहील असे अभय वाघमारे ह्यांनी सांगितले.
अभय हे प्रॉफेशनल क्रिकेटर आहेत जे गेली अठरा वर्षे डी. व्हाय. पाटील नवी मुंबई संघाकडून खेळत आहेत. गेली नऊ वर्षे ते फिटनेस प्रॉफेशनल कंसल्टंट म्हणून काम करत आहेत. नवी मुंबई पोलीस क्रिकेट क्लब या संघाचे ते हेड फिटनेस ट्रेनर होते. मराठी कलाकारांची वीर मराठी क्रिकेट टीम आहे (ज्याचे मालक रितेश देशमुख आहेत) त्यांचा हि एक वर्षे अभय हे फिटनेस कोच होते. अभय वाघमारे यांनी फ्युचर फर्स्ट अकॅडमी-फिटनेस फॉर जनरेशन्स या फिटनेस अकॅडमी ची स्थापना सात वर्षांपूर्वी केली आहे. त्यांनी असेपण सांगितले कि हि अकॅडमी देशातील एकमेव अशी अकॅडमी आहे कि ती लहान मुलांसाठी प्रत्येक्ष कार्यरत आहे, लहान मुलांची मानसिकता त्यांचे स्वास्थ ह्याचा ती विचार करत होती.
अभय वाघमारे ह्यांच्या वरील अनुभवाचा त्यांनी आपल्या “फ्युचर फर्स्ट अकॅडमी-फिटनेस फॉर जनरेशन्स” साठी वापर करून समाजामध्ये वयोवृद्ध आहेत ज्यांना अनेक व्याधी आहेत अशांसाठी तसेच लहान मुलांसाठी आणि खास करून लॉकडाउन मध्ये बाहेर फिरणे नसल्याने घरीच व्यायामाचे प्रकार कसे, कुठून माहिती पडतील ह्याचा विचार करून अभय वाघमारे यांनी फ्युचर फर्स्ट अकॅडमी-फिटनेस फॉर जनरेशन्स या फिटनेस अकॅडमी च्या माध्यमातून युट्युब चॅनेलचे १४ मे २०२१ रोजी अनावरण केले.
त्यांचा दृष्टिकोन असा आहे कि या चॅनेलच्या माध्यमातून सर्व वयोगटातील घटकांसाठी (लहान मुलांपासून ते वयोवृद्ध) सर्वांनाच व्यायामाचे आधुनिक व तांत्रिक प्रकार शिकण्यास मदत होईल. या चॅनेलमुळे समन्यातील सामान्य माणसाच्या घरो-घरी व्यायामाचे साइंटिफिक प्रकार पोहचन्यास मदत होईल जेणेकरून आपला समाज शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त होण्यास मदत होईल. युट्युब चॅनेलच्या माध्यमातून फक्त नवी मुंबई नव्हे तर पूर्ण देशात फिटनेसचा प्रसार साइंटिफिक दृष्ट्या घरोघरी पोहोचेल अशी आशा अभय ह्यांना आहे.
नवी मुंबई वार्ता असे आवाहन करते कि आपण सर्वानी अशा समाजहितोपयोगी गोष्टींना प्रोसाहित करावे, आपण सर्वानी “फ्युचर फर्स्ट अकॅडमी-फिटनेस फॉर जनरेशन्स” ह्या चॅनेलला मोठ्या प्रमाणात Like, Share व Subscribe करावे.
Abhay sir as I know is very dedicated fitness trainer very friendly with his students loving caring and tough. I got to know his other part thru this which is amazingly impressive . All the best to achieve his vision.
आपण असेच नवी मुंबई वार्ता च्या वेबसाईटला भेट देत रहा.