क्राइम

बिल्डींग वर पाईप व डग मधुन चढुन घरफोडी करणारा स्पायडरमॅन अटक

नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे करिता मा सह पोलिस आयुक्त श्री. डाॅ जय जाधव सो, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. महेश धुर्य सो गुन्हे, मा. पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. सुरेश मेगंडे सो व झोन 2 पनवेलचे पोलीस उपायुक्त श्री. शिवराज पाटील सो यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे व मा ACP सो गुन्हे मा ACP पनवेल सो मार्गदर्शनाखाली खारघर पोलीस ठाणे गुरनं. 323/2021 IPC 380, 457 या गुन्ह्याचा समांतर तपास खारघर पोलीस ठाणे व गुन्हे कक्ष 3 कडून सुरू असताना केलेल्या तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारमार्फत मिळालेल्या माहितीवरून तपास पथक गुन्हा घडल्यापासून दिवस-रात्र नवी मुंबई व मुंबई परिसरात आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान कक्ष 3 गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, API पवार, खरोटे व अंमलदार यांनी खालील आरोपी क्र. 1 व 2 तसेच खारघर पोलीस ठाणे कडील अधिकारी API मानसिंग पाटील व अंमलदार यांनी आरोपी क्र. 3 व 4 यांना सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतलेले आहे. सदर गुन्ह्यात आरोपी नामे 1) सैफ ईसा शेख, 2) सेराज नईम शाह, 3) शोएब वारीस कुरेशी, 4) मोहम्मद उमर मोहम्मद युसुफ शेख सर्व रा.मानखुर्द गोवंडी मुंबई परिसर यांना अटक करण्यात आलेले असून त्यांच्याकडून

खारघर पोलीस स्टेशनचे
1) CR NO 307/21-380,457
2) CR NO 193/21-380,457
3) CR NO 291/21-380,457
4) CR NO 314/21-380,457
5) CR NO 323/21-380,457
6) CR NO 343/21-380,457
7) CR NO 346/21-380,457

7 गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 2 लाख 71 हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल (सोन्याचे दागिने, हिरेची आंगठी, 3 लॅपटॉप, 10 मोबाईल, 3 टॅप) व गुन्ह्यात वापरलेली एक्टिवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास शत्रुघ्न माळी वपोनि, कक्ष 3 गुन्हे शाखा व खारघर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांचे मार्गदर्शन खाली API मानसिंग पाटील हे करीत असुन सदर आरोपी ह्यांनी नवी मुंबई परीसरात अजुन काही गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याने ते गुन्हे उघडकीस आणण्याची तजवीज ठेवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button