भवानी फाऊंडेशनकडून तृतीयपंथींना मदतीचा हात:
उरण (दिनेश पवार) : कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे, गरीब-गरजू नागरिकांना आधार द्यावा ह्या उद्धेशाने भवानी शिपिंग सर्विसेस इंडिया प्रायवेट लिमिटेडने पुढाकार घेऊन, कोरोना काळ सुरु झाल्यापासून भवानी फाऊंडेशनचे संस्थापक के.डी. शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गोर-गरीब गरजू नागरिकांना मदत म्हणून उरण तालुक्यातील पेण, उरण, व मुंबई, नवी मुंबई येथे सुमारे ६ हजार लोकांना अन्नदान केले आहे. उरण तालुक्यातील दाऊर नगर, नाईक नगर, नवघर झोपडपट्टी मुंबई, सांताक्रूझ आदी ठिकाणी दररोज सुमारे ३०० प्लेट्स अन्नदान केले.
रविवार (दि. ११) रोजी ठाणे वागळे ईस्टेट, नेहरूनगर वसाहतीत राहणारे ३८ तृतीयपंथींना, ५० जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप केले. त्यात ५ किलो तांदुळ, ५ किलो पीठ, ३ किलो डाळ, ३ किलो कांदे, ३ किलो बटाटे, १ किलो तेल, चहा पावडर २५० ग्राम, १ किलो साखर, हळदी – मिरची पावडर, तिखट मसाला आदी वस्तू देण्यांत आल्या. यावेळी भवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष जीक्षित शेट्टी, सेक्रेटरी रवी उचील, व्हाईस प्रेसिडेंट दिनेश शेट्टी, खजिनदार कुमार मोहन रॉय, ज़ॉइंट खजिनदार तथा ट्रस्टी नवीन शेट्टी, सिनिअर कमिटी मेंबर ईश्वर ऐल आदी मान्यवर उपस्थित होते.